Mohammad Nabi Retirement: पुढच्या वर्षी क्रिकेटमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची खेळवण्यात येणार आहे. दरम्यान या स्पर्धेनंतर एक मोठा खेळाडू निवृत्त होणार आहे. या खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आपण स्वतः निवृत्त होण्याचा इशारा दिला आहे. ३९ वर्षांच्या या खेळाडूने २०१९ मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. नबीने स्वत: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला आपल्या निर्णयाची माहिती दिलीये. दरम्यान यानंतरही नबी टी-२० क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करत राहणार आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसीब खान यांनी क्रिकबझला याची पुष्टी केलीये. नसीब खान म्हणाले, 'नबी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. नबीने त्याच्या निवृत्तीबाबत बोर्डाला त्याची इच्छा कळवलीये. त्याने मला काही महिन्यांपूर्वी सांगितलेलं की, त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आपली वनडे कारकीर्द संपवायची आहे आणि आम्ही त्याच्या निर्णयाचे स्वागत करतो.
नबी हा एक असा खेळाडू आहे, ज्याने वनडे फॉर्मेटमध्ये डेब्यूच्या सामन्यात शतक ठोकलं होतं. मोहम्मद नबीने अफगाणिस्तानसाठी 2009 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. यावेळी त्याने डेब्यूच्या सामन्यातच अर्धशतक झळकावलं होतं.
नबीने 165 वनडे सामन्यांमध्ये 27.30 च्या सरासरीने 3549 रन्स केले आहेत. याशिवाय त्याच्या नावे 171 विकेट्सही आहेत. शारजाहमध्ये सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमधील पहिल्या सामन्यात नबीने ८२ रन्सची खेळी करत टीमच्या कामगिरीत मोलाची भूमिका बजावली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.