Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, १८ वर्षांनंतर खेळवणार खास टूर्नामेंट

Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक परदेशी खेळाडू खेळले आहेत. लवकरच रोहित शर्मा किंवा विराट कोहली आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार असतील आणि बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, मेहदी हसन आणि मथिशा पाथिराना सारखे खेळाडू त्यांच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहेत.
Babar Azam play under Rohit Sharma
Babar Azam play under Rohit Sharma saam tv
Published On

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक परदेशी खेळाडू खेळले आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमकडून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक विदेशी खेळाडू खेळले आहेत. मात्र आता लवकरच रोहित शर्मा किंवा विराट कोहली आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार असतील आणि बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, मेहदी हसन आणि मथिशा पाथिराना सारखे खेळाडू त्यांच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहेत.

तुम्हाला कदाचित ही गोष्ट खोटी वाटत असेल, मात्र लवकरच असं घडण्याची शक्यता आहे. आफ्रिका क्रिकेट असोसिएशन अशा सामन्यांचं आयोजन करतेय. ही नेमकी संकल्पना काय असणार आहे, ते पाहूयात.

Babar Azam play under Rohit Sharma
Rohit Sharma: रोहित शर्मा दुसऱ्यांदा होणार बाबा? रोहित ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या टेस्टला मुकण्याची शक्यता, Video आला समोर

आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या एजीएममध्ये आफ्रो-आशिया कप पुन्हा आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. 2005 आणि 2007 मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. जर आफ्रिकन बोर्डाची ही योजना यशस्वी झाली तर लवकरच याचा तिसरा सिझन खेळवला जाऊ शकतो. आफ्रिकन इलेव्हन आणि आशियाई इलेव्हन यांच्यात आफ्रो-आशिया कप खेळला जातो हे क्रिकेटप्रेमींना माहीतीये. आफ्रिकन इलेव्हनमध्ये मुख्यतः दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेच्या खेळाडूंचा समावेश आहे. आशियाई इलेव्हनमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे खेळाडू खेळतात.

इंजमामच्या नेतृत्वाखील खेळले होते सेहवाग - द्रविड

2005 मध्ये ज्यावेळी आफ्रो-आशिया कपचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यानंतर आशियाई इलेव्हनचे कर्णधारपद पाकिस्तानच्या इंझमाम उल हककडे सोपवण्यात आलं होतं. तर दुसरीकडे आफ्रिका इलेव्हनची कमान शॉन पोलॉककडे देण्यात आली होती. याशिवाय ग्रॅमी स्मिथने आफ्रिकन टीमचे नेतृत्व केलं होतं. आशियाई इलेव्हनमध्ये इंझमामच्या नेतृत्वाखालील या टीममध्ये राहुल द्रविड, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, आशिष नेहरा आणि झहीर खान या सहा भारतीय खेळाडूंनी भाग घेतला होता.

Babar Azam play under Rohit Sharma
IND vs SA: हार्दिकचं टेन्शन वाढणार! हा स्टार ऑलराऊंडर पहिल्याच सामन्यात करु शकतो पदार्पण

यानंतर 2007 मध्ये पुन्हा एकदा आफ्रो-आशिया कप पुन्हा एकदा जयवर्धने आणि शोएब मलिक यांच्या नेतृत्वाखाली खेळला गेला. यावेळी ही स्पर्धा वनडे आणि टी-२० अशा दोन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आली होती. महेला जयवर्धनेने वनडे फॉर्मेटमध्ये एशियन इलेवन टीमचे नेतृत्व केलं होतं. तर शोएब मलिकने टी-20 टीमची कमान सांभाळली होती. आशियाई टी-२० टीममध्ये सचिन तेंडुलकर आणि मुनाफ पटेल यांचा समावेश करण्यात आला होता.

Babar Azam play under Rohit Sharma
IPL 2025 Auction: IPL चा लिलाव किती वाजता सुरु होईल? समोर आली मोठी अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com