T20 World Cup: झिम्बाब्वेविरूद्ध भिडण्याआधीच भारताचा सेमीफायनलचा रस्ता ठरणार, वाचा नेमकं समीकरण काय आहे?

Semi final qualification scenario: टी20 वर्ल्डकप सुपर 8 मध्ये आज भारत-झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज-दक्षिण आफ्रिका हे दोन निर्णायक सामने खेळवले जाणार आहेत. भारतासाठी मोठ्या फरकाने विजय आवश्यक असून सेमीफायनलचे समीकरण दुसऱ्या सामन्याच्या रिझल्टवरही अवलंबून आहे.
Semi final qualification scenario
Semi final qualification scenariosaam tv
Published On

आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्डकपच्या सुपर ८ मध्ये आजच्या दिवशी दोन महत्त्वाचे सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये एक सामना भारत विरूद्ध झिम्बाब्वे असणार रंगणार आहे. तर दुसरा सामा वेस्ट इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. या दोन्ही सामन्यांमुळे सेमीफायनलचं चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.

चेन्नईच्या मैदानावर टीम इंडिया विरूद्ध झिम्बाव्बे आमने सामने येणार आहेत. सुपर ८ च्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने भारताला ७६ रन्सने पराभूत केलं होतं. त्यामुळे भारताचं रनरेट घसरलं असून ते -3.80 वर पोहोचलंय. त्यामुळे आजच्या सामन्यात केवळ विजय महत्त्वाचा नाही तर मोठा फरकाचा विजय गरजेचा आहे.

Semi final qualification scenario
T20 World Cup 2026: सेमीफायनलची दारं उघडी ठेवण्यासाठी भारतासमोर NRRचं गणित, झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचं स्पष्ट समीकरण पाहा

आजच्या सामन्यात टीम इंडियासाठी सर्वा मोठी चिंता म्हणजे टॉप ऑर्डरची. गेल्या काही सामन्यांपासून अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाही. ओपनिंगला केवळ इशान किशन डाव सांभाळताना दिसतोय. शिवाय कर्णधार सूर्यकुमार यादवला देखील त्याचा स्ट्राईक रेट वाढवण्याची गरज आहे.

Semi final qualification scenario
T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी मोठी अपडेट, मॅच विनर फलंदाजानं अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कारण चिंताजनक

गोलंदाजीवर नजर टाकली तर भारत या ठिकाणी काहीसा मजबूत स्थितीत दिसून येतो. टीम इंडियाचा सर्वोत्तम गोलंदाज जसप्रित बुमराह चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तर त्याला सामन्यांमध्ये अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि वरूण चक्रवर्ती यांची चांगली साथ मिळणाना दिसतेय. त्यामुळे मोठ्या फरकाने झिब्माब्वेचा पराभव करणं हे एक समीकरण टीम इंडियासमोर आहे.

वेस्ट इंडिज vs दक्षिण अफ्रिका

दुसरीकडे वेस्ट इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका अहमदाबादमध्ये एकमेकांसमोर उतरणार आहेत. दोन्ही टीम्सने आता सुपर ८ पर्यंत एकही सामना गमावलेला नाही. वेस्ट इंडिजने गेल्या सामन्यात झिम्बाब्वेचा १०७ रन्सने पराभव केला होता. त्यामुळे आजचा सामने निर्णयाक ठरणार आहेत.

Semi final qualification scenario
टीम इंडियासाठी गुड न्यूज; तगडा खेळाडू पुन्हा संघात परतणार

अहमदाबादमधील सामना भारतासाठी का महत्त्वाचा?

भारताचं भविष्य केवळ स्वतःच्या सामन्यावर अवलंबून नाहीये. जर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केला तर टीम इंडियाचा मार्ग सोपा होऊ शकतो. पण जर वेस्ट इंडिज जिंकली तर भारतासाठी सेमीफायनलचं समीकरण अधिक गुंतागुंतीचं होणार आहे. म्हणजेच चेन्नई आणि अहमदाबाद दोन्ही ठिकाणांचे निकाल एकमेकांशी जोडलेले आहेत.

कसं आहे समीकरण?

भारताचा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. त्यापूर्वी अहमदाबादमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिज-दक्षिण आफ्रिका सामन्याचा रिझल्ट लागेल. जर वेस्ट इंडिज जिंकली तर भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी नाकीनऊ येणार आहेत. कारण त्यानंतरच भारत त्यांचे दोन्ही सामने जिंकला तरच सेमीफायनलचे दरवाजे उघडणार आहेत.

Semi final qualification scenario
T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

पण जर दक्षिण आफ्रिका जिंकली तर भारताचा पुढचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध असणार आहे. अशावेळी जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. पण अजून एक बाब म्हणजे जर वेस्ट इंडिज जिंकली तर भारताला झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेला हरवावं अशी प्रार्थना करावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com