T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

New Zealand vs Sri Lanka Super 8 Highlights : टी २० वर्ल्डकप २०२६ या स्पर्धेतून श्रीलंका संघ बाहेर झाला आहे. सुपर ८ मधील करो या मरो सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला.
श्रीलंका संघ वर्ल्डकपमधून बाहेर
NZ vs SL match highlightsicc / x
Published On

NZ vs SL t20 Highlights : विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ असलेला श्रीलंका या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. सुपर ८ मधील अत्यंत महत्वाच्या अशा लढतीत न्यूझीलंडनं श्रीलंकेचा ६१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने १६८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाला १०७ धावाच करता आल्या.

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत श्रीलंका संघाचा कर्णधार दासून शनाका यानं नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंड संघानं २० षटकांत ७ बाद १६८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनर यानं ४७ धावा केल्या. त्यात ४ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. कोल मॅककॉन्ची यानं चांगली साथ देताना ३१ धावा केल्या. फिन एलेन, रचिन रविंद्र, ग्लेन फिलिप्स यांनीही चांगल्या धावा केल्या.

श्रीलंकेकडून तिक्षणा यानं तीन, आणि दुश्मंथा चमिरा यानं तीन विकेट घेतल्या. वेल्लालागे यानं एक विकेट घेतली. अखेरच्या ओव्हरमध्ये श्रीलंकेचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. त्यामुळे न्यूझीलंड संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

१६९ धावांचं माफक लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. अवघ्या ६ धावा असताना दोन विकेट गमावल्या. २४ धावांवर चार फलंदाज माघारी परतले होते. ५९ धावांवर ६ विकेट गमावल्या. श्रीलंकेला २० षटकांत ८ विकेटच्या बदल्यात अवघ्या १०७ धावाच करता आल्या. ६१ धावांनी पराभूत झालेला श्रीलंकेचा संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाला.

श्रीलंका संघ वर्ल्डकपमधून बाहेर
T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी मोठी अपडेट, मॅच विनर फलंदाजानं अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कारण चिंताजनक

सुपर ८ मधील हा सामना श्रीलंकेसाठी अत्यंत महत्वाचा होता. यजमान संघ सुपर ८ च्या पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाला होता. न्यूझीलंड संघानेही सुपर ८ मध्ये विजय मिळवला नव्हता. पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता. हा सामना पावसामुळं रद्द झाला होता. दोन्ही संघांना एक - एक गुण मिळाला होता.

श्रीलंका संघ वर्ल्डकपमधून बाहेर
semi final scenario for india : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, सेमिफायनलचा फक्त १ मार्ग उरला, असं असेल समीकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com