semi final scenario for india : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, सेमिफायनलचा फक्त १ मार्ग उरला, असं असेल समीकरण
टी २० वर्ल्डकपमध्ये सलग ४ सामन्यांमध्ये अपराजित ठरलेल्या टीम इंडियाचा सुपर ८ फेरीत पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दारूण पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडिया चहूबाजूने निशाण्यावर आली आहे. दुसरीकडं सेमिफायनलमध्ये जाण्याचा मार्गही खडतर झाला आहे. सुरुवातीला नेट रनरेटवर अवलंबून असलेल्या टीम इंडियासमोर आता सेमिफायनलचा केवळ एकच मार्ग उरला आहे.
सुपर ८ मधील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिका संघानं ७६ धावांनी दारूण पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाचा नेट रनरेट -३ च्या पलीकडे गेला. या पराभवानंतर जर तिन्ही संघ दोन-दोन सामने जिंकल्यानंतर सेमिफायनलचा निकाल नेट रनरेटच्या आधारे होईल, असे मानले जात होते. पण आता हे समीकरण पूर्णपणे बदलले आहे.
वेस्ट इंडीजने सगळं गणित विस्कटलं
दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या दारूण पराभवानंतर टीम इंडियाच्या अडचणीत वेस्ट इंडीजनंही भर टाकली. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात १०७ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे वेस्ट इंडीजचा नेट रनरेट +५ पेक्षा अधिक झाला. दक्षिण आफ्रिकाहून तो अधिक आहे. वेस्ट इंडीज संघ गुणतालिकेत ग्रुपमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे.
आता नेट रनरेटचं समीकरण विसरा...
वेस्ट इंडीजच्या या मोठ्या विजयानंतर सेमिफायनल समीकरण पूर्णपणे बदलले आहे. भारताने दोन्ही सामने जिंकले तरीही नेट रनरेट -३ पेक्षा कमी होऊन तो वेस्ट इंडीज किंवा दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगला होईल याची शक्यता कमी आहे.भारत, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे दोन - दोन सामने जिंकले तरी भारताचा सेमिफायनलचा दरवाजा बंद होईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण नेट रनरेटमुळं दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ सेमिफायनलमध्ये जातील.
भारताकडे शेवटचा पर्याय
टीम इंडियाकडे सेमिफायनलमध्ये पोहोचण्याचा केवळ एकच मार्ग उरला आहे. टीम इंडियानं झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज या दोन्ही संघांना मोठ्या फरकाने पराभूत करायला हवं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव व्हायला हवा. विशेष म्हणजे, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्याच्या काही वेळ आधीच होणार आहे. त्यामुळे गुरुवारी जेव्हा टीम इंडिया मैदानावर खेळण्यासाठी उतरेल, त्याच्या काही वेळ आधीच सेमिफायनलचं चित्र जवळपास स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

