टीम इंडियासाठी गुड न्यूज; तगडा खेळाडू पुन्हा संघात परतणार

team india news : टीम इंडियासाठी गुड न्यूज आहे. भारताचा तगडा खेळाडू पुन्हा संघात परतणार आहे.
Team India Squad
team indiayandex
Published On
Summary

रिंकू वडिलांच्या प्रकृतीमुळे घरी गेला होता

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी रिंकू सिंह पुन्हा संघात परतणार

टीम मॅनेजमेंटचा रिंकू सिंहवर विश्वास

टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिंकू सिंह पुन्हा एकदा संघात कमबॅक करणार आहे. रिंकू सिंहच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे तातडीने टी२० विश्वचषक स्पर्धा अर्ध्यात सोडून घरी परतला होता. टीम इंडियाचा बॅटिंग कोच सिंताशु कोटक यांनी झिम्बाब्वेच्या विरोधातील सामन्याआधी म्हणजे बुधवारी हॉटेलमध्ये येणार आहे. त्यामुळे रिंकू हा २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसेल. झिम्बाब्वे विरोधात सामना जिंकणे भारतासाठी महत्त्वाचं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिंकू सिंहचे वडील खानचंद सिंह कर्करोगाशी झुंज देत आहे. यामुले त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना ग्रेटर नोएडा येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच रिंकूने घरी जाण्याचा निर्णय घेतला. आता रिंकू पुन्हा संघात परतणार करणार असून तो चेन्नईसाठी निघाला आहे.

Team India Squad
Ahilyanagar road Accident : अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश

टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'रिंकू सिंह हा आज पुन्हा संघात सामील होईल. त्यामुळे रिंकू सिंह टी२० स्पर्धेतून बाहेर होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रिंकू हा संघातील गेम चेंजर खेळाडू आहे. त्याच्या खेळीवर भारतीय चाहत्यांचंही प्रेम आहे. रिंकू फलंदाजासह चांगला फिल्डर देखील आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटचाही रिंकू सिंहवर विश्वास आहे.

Team India Squad
मोठी बातमी! BMCच्या ३६ कोटींच्या ठेवी मोडणार, कारणही आलं समोर

तत्पूर्वी, रिंकू सिंहला आतापर्यंत एकही सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही. रिंकू सिंहला आतापर्यंत पाच सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली. परंतु रिंकूने पाच डावात एकूण २४ धावा कुटल्या. रिकूंने अमेरिकेच्या विरोधात ६, नामीबियाविरोधात १, पाकिस्तानविरोधात ११ आणि नेदरलँडविरोधात ६ धावा कुटल्या. तर सुपर-८मध्ये दक्षिण आफ्रिकेत शून्य धावावर बाद झाला. परंतु आताही टीम मॅनेजमेंटचा रिंक सिंहवर विश्वास आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com