T20 World Cup 2026: सेमीफायनलची दारं उघडी ठेवण्यासाठी भारतासमोर NRRचं गणित, झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचं स्पष्ट समीकरण पाहा

ICC Men's T20 World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर टीम इंडियाचं नेट रन रेट मोठ्या प्रमाणात घसरलं आहे. आता झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय मिळवणं सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
ICC Men's T20 World Cup 2026
ICC Men's T20 World Cup 2026saam tv
Published On

ICC T20 वर्ल्डकप 2026 च्या सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 रन्सच्या मोठ्या फरकाने पराभव झाला. या दारुण पराभवानंतर टीम इंडियाचं नेट रन रेट (NNR) -3.80 झालं आहे. तर दक्षिण आफ्रिकेचं नेट रन रेट +3.80 आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला 107 रन्सने पराभूत केलं असून त्यांचं नेट रन रेट +5.350 पर्यंत पोहोचलंय.

आता टीम इंडिया आपला पुढचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे. जर भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचे प्रत्येकी 4 गुण असतील तर सेमीफायनलचा निर्णय नेट रन रेटच्या आधारे घेतला जाणार आहे. अशा परिस्थितीतटीम इंडियाला झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागेल. जेणेकरून नेट रन रेट प्लसवर येण्याची शक्यता आहे.

ICC Men's T20 World Cup 2026
IND vs SA: या 3 कारणांमुळे भारताचा दारूण पराभव; सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला लोळवलं

टीम इंडिया पहिली फलंदाजी केली तर काय करावं लागेल?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सुपर ८ सामना गुरुवारी २६ फेब्रुवारी रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. टीम इंडियाला त्यांच्या पहिल्या सुपर ८ सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ७६ रन्सने पराभव पत्करावा लागला. जर भारताने झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम फलंदाजी केली तर प्लसमध्ये नेट रन रेट नेण्यासाठी ७७ किंवा त्याहून अधिक रन्सने विजय मिळवावा लागेल.

असं करण्यासाठी, टीम इंडियाला झिम्बाब्वेविरुद्ध मोठा स्कोर उभारावा लागणार आहे. तर झिम्बाब्वेच्या खेळाडूंना लवकर माघारी पाठवावं लागणार आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाने १८ वेळा ७७ पेक्षा जास्त रन्सने विजय मिळवला आहे.

ICC Men's T20 World Cup 2026
T20 World Cup : गौतम गंभीरच्या पॉलिटिक्सनं टीम इंडियाला बर्बाद केलं; पाकिस्तानी क्रिकेटपटूनं नाक खुपसलं

जर भारताने पहिल्यांदा गोलंदाजी घेतली तर?

झिम्बाब्वेविरुद्ध रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाला रन रेट प्लसमध्ये नेणं काहीसं कठीण राहणार आहे. जर झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १५० रन्स केले तर टीम इंडियाला १३ व्या ओव्हरपर्यंत लक्ष्य पूर्ण करावं लागणार आहे. जर झिम्बाब्वेने १८० रन्स केले तर भारताला १४ व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे.

ICC Men's T20 World Cup 2026
T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी मोठी अपडेट, मॅच विनर फलंदाजानं अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कारण चिंताजनक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com