IND vs SA: या 3 कारणांमुळे भारताचा दारूण पराभव; सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला लोळवलं

Reasons behind Team India defeat: टी-२० वर्ल्डकप सुपर ८ सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा झालेला पराभव, खराब गोलंदाजी, संथ फलंदाजी ही यामागे कारणं ठरल्याचं समोर आलंय.
Reasons behind Team India defeat
Reasons behind Team India defeatsaam tv
Published On

टी-२० वर्ल्डकपमध्ये सुपर ८ स्टेजला सुरुवात झाली आहे. रविवारी टीम इंडियाने या स्टेजमधील पहिला सामना खेळला आणि त्यात भारताला पराभव पत्करावा लागला. गतविजेती टीम इंडिया यंदाच्या वर्ल्डकपमध्येही विजयाची दावेदार मानली जातेय. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेला पराभव हा वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंग करू शकतो.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ७६ रन्सने पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना एकतर्फी जिंकला. मात्र हा पराभव झाला कसा, यामागे नेमकी कारणं आहेत की जाणून घेऊया.

खराब गोलंदाजी

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी अत्यंत खराब झाली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० ओव्हर्समध्ये ७ बाद १८७ रन्स केले. मुख्य म्हणजे सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेने केवळ २० रन्समध्ये तीन विकेट गमावले होते.

Reasons behind Team India defeat
Team India Semi Final Scenario: 'विराट' वाट! भारत आता सेमीफायनलमध्ये पोहचणार का? वाचा संपूर्ण समीकरण

सुरुवातीच्या तीन विकेट्स गमावल्यानंतर असं वाटत होतं की, आफ्रिकेची टीम १५० च्या स्कोरपर्यंत पोहोचणार नाही. परंतु डेव्हिड मिलर (६३), डेवाल्ड ब्रुविस (४५) आणि रायन रिकेल्टन (४४) यांच्या खेळीमुळे स्कोर १८७ रन्सपर्यंत पोहोचला. याठिकाणी भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले.

सुरुवातीला संथ गतीने फलंदाजी

१८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने सुरुवातीला फारच संथ गतीने खेळ केला. विकेट्स पडत राहिल्या पण टीम इंडियाचा स्कोर होत नव्हता. पॉवरप्लेमध्ये भारताचा स्कोअर फक्त ३ विकेट्सवर ३१ असा होता. या संथ खेळामुळे टीम इंडियासाठी सामना जिंकणं कठीण झालं.

Reasons behind Team India defeat
T20 World Cup 2024, Semi Final: टीम इंडिया सेमिफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडणार? चारही संघांसाठी असं असेल समीकरण

फलंदाजांपेक्षा आलराऊंडवर जास्त विश्वास

रन्सचा पाठलाग करताना टीम इंडिया फलंदाजांपेक्षा ऑलराऊंडर्सवर जास्त अवलंबून असल्याचं पाहायला मिळालं. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. तर रिंकू सिंग आठव्या क्रमांकावर आला. रिंकू क्रीजवर येईपर्यंत सामना भारताने जवळपास गमावला गेला होता. सुंदरऐवजी रिंकूला पाठवलं असतं तर परिस्थिती वेगळी असती.

Reasons behind Team India defeat
T20 World Cup 2026: 'या' चुकीमुळे टीम इंडियाच्या हातातून निसटला सामना; पराभवानंतर सूर्यादादा संतापला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com