Team India Semi Final Scenario: 'विराट' वाट! भारत आता सेमीफायनलमध्ये पोहचणार का? वाचा संपूर्ण समीकरण

india semi final qualification scenario: टी-२० वर्ल्डकप २०२६ सुपर ८ सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताला ७६ रन्सने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाचं रनरेट घसरलं असून सेमीफायनल गाठण्यासाठी पुढील सामने जिंकणं अत्यावश्यक ठरणार आहे.
india semi final qualification scenario
india semi final qualification scenariosaam tv
Published On

टी-२० वर्ल्डकप २०२६ मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. रविवारी ग्रुप स्टेजमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाला दारूण पराभवाचा सामना करावा लागलाय. दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या भारताला ७६ रन्सने पराभूत केलंय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेसमोर नांगी टाकली.

या सामन्यात शिवम दुबे वगळता कोणत्याही इतर फलंदाजाला २० पेक्षा अधिक रन्स करता आले नाहीत. अवघ्या १११ रन्सवर संपूर्ण टीम इंडिया पव्हेलियनमध्ये परतली होती. तर आता या पराभवानंतर टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकणार का हा प्रश्न सर्वांसमोर आहे.

india semi final qualification scenario
India T20 World Cup Squad : किंग कोहलीवर विश्वास कायम, पंत आणि चहलचंही कमबॅक; टी-20 वर्ल्डकप टीमबाबत ५ महत्वाचे मुद्दे

सुपर ८ च्या स्टेजमध्ये प्रत्येक टीमसाठी विजयासोबत रन-रेट देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेला हा पराभव टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंग करू शकतो.

पराभवासोबत रनरेटवरही परिणाम

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या या पराभवानंतर टीम इंडियाच्या रनरेटवर परिणाम झाला आहे. दक्षिण आफ्रिकेला या विजयामुळे २ पॉईंट्स मिळाले आहेत. तर पराभवामुळे भारताचं रनरेट -3.800 झालं आहे. खरं तर हे चिंता करण्यासाठी बाब आहे. कारण सुपर ८ च्या फॉर्मेटमध्ये रनरेट अधिक महत्त्वाचं असणार आहे.

india semi final qualification scenario
India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरची भारतीय गोलंदाजांपुढे शरणागती; अवघ्या २० धावांमध्ये ३ जण परतले तंबूत

आता सेमीफायनलमध्ये कशी पोहोचणार टीम इंडिया?

आता टीम इंडियाचा पुढचा सामना २६ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये झिम्बाब्वेशी होणार आहे. तर १ मार्च रोजी भारत कोलकाता इडन गार्डन्स मैदानावर वेस्टइंडिज विरूद्ध सामना करणार आहे. सेमीफायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत भारताला हे दोन्ही सामना जिंकावे लागणार आहेत.

india semi final qualification scenario
ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला हरवल्यानंतरही भारत फक्त चार पॉईंट्स कमावणार आहे. तर आणखी एक सामना जिंकल्याने दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात चार गुणांची भर पडणार आहे. यामुळे सेमीफायनलचं त्याचं तिकीट कन्फर्म होणार आहे. या परिस्थितीत, भारताला दक्षिण आफ्रिकेने त्यांचे उर्वरित सामने जिंकावेत अशी प्रार्थना करावी लागेल. तर वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेने एकापेक्षा जास्त सामने जिंकू नयेत. जर असं झालं तर भारत आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहोचतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com