India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरची भारतीय गोलंदाजांपुढे शरणागती; अवघ्या २० धावांमध्ये ३ जण परतले तंबूत

India vs South Africa T20 World Cup: आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ सामन्यात आज भारत दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. गेल्या दोन महिन्यांत दोन्ही संघांची ही सहावी लढत आहे. या विश्वचषकात ते पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलेत.
India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरची भारतीय गोलंदाजांपुढे शरणागती; अवघ्या २० धावांमध्ये ३ जण परतले तंबूत
Published On
Summary
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सुपर 8 सामना अपडेट

  • २० धावांत ३ विकेट दक्षिण आफ्रिका कोसळली

  • आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरला शरणागती पत्कारावी लागली.

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसाने आलेत. या विश्वचषकात ते पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या संघात चार बदल केले, परंतु भारताने कोणताही बदल न करता मैदानात उतरलीय. दरम्यान या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपलं वर्चस्व ठेवत दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरला शरणागती पत्कारावी लागली.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डी कॉक आणि मार्क्रम यांनी डावाची सुरुवात केली. परंतु दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने डी कॉकला त्रिफळाचित केलं. डी कॉकने फक्त ६ धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात अर्शदीपने मार्क्रमला बाद केले. यावेळी दक्षिण आफ्रिका फक्त १२ धावांवर होती.

तरीही बुमराहचा कहर थांबला नाही. बुमराहने त्याच्या दुसऱ्या आणि डावातील चौथ्या षटकात रायन रिकेल्टनला बाद केले. रिकेल्टनने फक्त ७ धावा केल्या. ६ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ३ बाद ४१ अशी होती.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com