ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

T20 World Cup 2026: आयसीसी टी२० विश्वचषकाच्या २०२६ च्या स्पर्धेत टीम इंडियाने कोणताही पराभव न होता सुपर ८ टप्प्यात प्रवेश केलाय. भारतीय संघाला सेमीफायनल मध्ये जाण्यास किती सामने जिंकावे लागलेत ते जाणून घेऊ.
T20 World Cup 2026:
Team India gears up for crucial Super 8 clashes in ICC T20 World Cup 2026.saam tv
Published On
Summary
  • टीम इंडिया सुपर 8 टप्प्यात अपराजित.

  • सेमीफायनलसाठी किमान 2 विजय आवश्यक ठरू शकतात.

  • नेट रन रेट निर्णायक ठरण्याची शक्यता.

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ ची स्पर्धा आता अतिशय रंजक टप्प्यावर पोहोचलीय. स्पर्धेत आता सुपर ८ चे सामने सुरू आहेत. याचा अर्थ उपांत्य फेरीची शर्यत सुरू झालीय. दरम्यान तुम्हाला हे माहित असले पाहिजे की सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागतील हे जाणून घेऊ.

T20 World Cup 2026:
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने मुलगा अगस्त्य आणि एक्स पत्नी नताशाला दिली एक खास भेटवस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क

यावर्षी टी-२० विश्वचषकात २० संघ सहभागी झाले होते, त्यापैकी १२ संघांचा वर्ल्ड कपमधील प्रवास संपलाय. या वर्षी टी-२० विश्वचषकातील पहिल्या फेरीनंतर १२ संघ बाहेर पडलेत. आता, जेतेपदाच्या शर्यतीत फक्त आठ संघ उरले आहेत आणि सध्या सुपर ८ सामने खेळले जात आहेत. या आठपैकी फक्त चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, म्हणजेच या फेरीनंतर चार संघ स्पर्धेतून बाहेर पडतील.

T20 World Cup 2026:
IND Vs SA: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कशी असणार भारताची प्लेईंग ११; या खेळाडूचा पत्ता होणार कट?

भारताच्या गटात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. टीम इंडियाच्या गटात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे तीन संघ आहेत. भारताचा पहिला सुपर ८ सामना आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे, त्यानंतर झिम्बाब्वेसोबत आहे. त्यानंतर १ मार्च रोजी भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. हा सामना टीम शेवटचा सुपर ८ सामना असेल.

जर टीम इंडियाने तिन्ही सामने जिंकले तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. भारताच्या तीन विजयांचा अर्थ असा होईल की त्यांच्या गटातील इतर कोणताही संघ सहा गुणांपर्यंत पोहोचू शकणार नाही. जर भारताने फक्त दोन सामने जिंकले आणि एक गमावला, तरीही ते उपांत्य फेरीत पोहोचतील. परंतु हे इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे.

सुपर ८ मध्ये असे होईल की, एकापेक्षा जास्त संघ समान गुणांसह उभे राहतील, अशा परिस्थितीत, कोणता संघ पुढे आहे आणि कोणता मागे आहे हे नेट रन रेटवरून ठरवले जाईल. त्यामुळे प्रत्येक संघ प्रत्येक करेल की, किमान दोन सामने जिंकण्याचा प्रयत्न करतील. पण जो संघ तीनपैकी फक्त एक सामना जिंकेल त्याला उपांत्य फेरीत पोहोचण्याची अशक्य होईल. भारताच्या गटातील कोणते दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतात आणि कोणते दोन संघ बाहेर पडतात हे पाहणे बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com