IND Vs SA: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कशी असणार भारताची प्लेईंग ११; या खेळाडूचा पत्ता होणार कट?

Abhishek Sharma Not Dropped From Team India Playing XI: टी-२० वर्ल्डकप सुपर ८ फेरीत भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादमध्ये महत्त्वाचा सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये अक्षर पटेलच्या कमबॅकची शक्यता आहे.
Abhishek Sharma Not Dropped
Abhishek Sharma Not Dropped saam tv
Published On

टी-२० वर्ल्डकप सुरु असून सद्या सुपर ८ चे सामने खेळवण्यात येतायत. आज सुपर ८ मध्ये भारताचा सामना होणार आहे. आज २२ फेब्रुवारी रोजी भारत दक्षिण विरूद्ध आफ्रिका यांच्यात सामना रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल चर्चा सुरू आहे. आतापर्यंत भारताने या वर्ल्डकपमध्ये एकही सामना गमावलेला नाही. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सुपर ८ सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

अभिषेक शर्माला प्लेईंग ११ मधून वगळणार?

२०२६ टी-२० वर्ल्डकपमध्ये अजून टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माला फारसा चांगला खेळ करता आला नाही. गेल्या तीन सामन्यात तो सलग तीन वेळा शून्यावर बाद झालाय. मात्र तरीही संघातून वगळण्यात येणार नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यापूर्वी याचे स्पष्ट संकेत दिलेत.

त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात देखील इशान किशनसोबत ओपनिंगला अभिषेक शर्माच उतरणार आहे. तर तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. या सामन्यात अभिषेककडून मोठ्या खेळीची अपेक्षा करण्यात येतेय.

Abhishek Sharma Not Dropped
T20 World Cup 2026: पाकिस्तानी खेळाडू म्हणतो, भारत सेमीफायनलपर्यंत जाणारच नाही; कारणंही सांगितलं

भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागात बदल होण्याची शक्यता आहे. अक्षर पटेल अंतिम अकरा जणांमध्ये परतण्याची शक्यता आहे. अक्षरला शेवटच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती, परंतु अहमदाबादच्या खेळपट्ट्यांवरील त्याचा रेकॉर्ड आणि घरच्या मैदानावरील अनुभव यामुळे त्याला वॉशिंग्टन सुंदरपेक्षा जास्त पसंती मिळू शकते.

कशी असेल मिडल ऑर्डर?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव स्वतः चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे ऑलराऊंडर टीममध्ये असणार आहेत. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग गोलंदाजीचा भार सांभाळतील. तर स्पिनर म्हणून अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना प्लेईंग ११ मध्ये समावेश असणार आहे.

Abhishek Sharma Not Dropped
Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा खेळणार की नाही? कॅप्टन सूर्यकुमारनं दिली नेमकी माहिती...

टीम इंडियाच्या गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यातील प्लेईंग ११ मध्ये अक्षर पटेलचं कमबॅक होणार आहे. अक्षरला शेवटच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती, परंतु अहमदाबादच्या पीचवरील त्याचा रेकॉर्ड आणि घरच्या मैदानावरील अनुभव यामुळे त्याला आज संधी मिळू शकते.

Abhishek Sharma Not Dropped
PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

कशी असेल आज प्लेईंग ११

अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com