Earthquake : अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं! अनेकांची घरे उध्वस्त, २० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

Afganistan News : अफगाणिस्तानात पाकिस्तान सीमेजवळ ६.० तीव्रतेचा भूकंप झाला असून किमान २० जणांचा मृत्यू आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Earthquake : अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं! अनेकांची घरे उध्वस्त, २० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी
Afganistan NewsSaam Tv
Published On
Summary
  • पाकिस्तान सीमेजवळील अफगाणिस्तानात ६.० तीव्रतेचा भूकंप

  • २० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

  • अनेक घरे उद्ध्वस्त

  • मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, मदतकार्य सुरू

पाकिस्तान सीमेजवळील आग्नेय अफगाणिस्तानात रविवारी रात्री उशिरा झालेल्या तीव्र भूकंपाने पुन्हा एकदा जनजीवन हादरवून सोडले आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, हा भूकंप स्थानिक वेळेनुसार रात्री ११:४७ वाजता झाला असून त्याची तीव्रता ६.० इतकी होती. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील बासावूल शहरापासून सुमारे २२ मैल उत्तरेस होते आणि त्याची खोली अवघी ६.२ मैल असल्याने तो अत्यंत तीव्र स्वरूपाचा होता. यामुळे भूकंपाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला असून सध्या मिळालेल्या माहितीनुसार किमान २० जणांचा मृत्यू झाला आहे तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

नांगरहार सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रवक्ते नकीबुल्लाह रहीमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जखमींवर स्थानिक रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तालिबान सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत आणि बरेच नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Earthquake : अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं! अनेकांची घरे उध्वस्त, २० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी
Earthquake Alert: भूकंप आल्यास त्वरित अँड्रॉइड फोनवर अलर्ट कसा मिळवता येईल? वाचा सविस्तर माहिती

भूकंप झाल्यानंतर अवघ्या २० मिनिटांनी त्याच भागात आणखी एक धक्का बसला. त्याची तीव्रता ४.५ इतकी नोंदवली गेली असून तोदेखील उथळ स्वरूपाचा होता. या दुहेरी धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Earthquake : अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं! अनेकांची घरे उध्वस्त, २० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी
Afganistan | तालिबान्यांकडून अमेरिकेच्या 6 विमानांचं अपहरण - अमेरिकेचा आरोप

अफगाणिस्तान हा भूकंपप्रवण देश मानला जातो. गेल्या काही वर्षांत या देशाने भूकंपामुळे मोठा विध्वंस अनुभवला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये ६.३ तीव्रतेच्या भूकंपाने देशाला हादरवले होते, ज्यामध्ये तालिबान सरकारने सुमारे ४,००० लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता, तर संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार १,५०० पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. युनिसेफच्या अहवालानुसार, मृतांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक महिला आणि मुलांचा समावेश होता. त्याआधी जून २०२२ मध्ये ५.९ तीव्रतेच्या भूकंपात १,००० पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले होते आणि १,५०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.

Earthquake : अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं! अनेकांची घरे उध्वस्त, २० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी
Afganistan | अफगाणिस्तानच्या काबुल एअरपोर्टवर गोळीबार, महत्त्वाची बातमी

दरम्यान तालिबान सरकारच्या आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि सुरक्षा दल मदतकार्य करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com