Dhanshri Shintre
रशियाच्या कामचटका भागात 8.8 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून, त्यानंतर अनेक देशांमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
या भूकंपाचा भारतावर परिणाम नाही, तरी भारत भूकंपप्रवण देश आहे. येथेही अनेकदा भूकंप होतात आणि त्याचा धोका कायम असतो.
आज आम्ही तुम्हाला गुगलच्या भूकंप अलर्ट फीचरबद्दल माहिती देणार आहोत, जे अँड्रॉइड युजर्ससाठी अत्यंत उपयोगी ठरू शकते.
अँड्रॉइडवरील हे फीचर नैसर्गिक आपत्ती टाळू शकत नाही, पण वेळेवर अलर्ट देऊन सुरक्षित स्थळी पोहोचण्यास मदत करू शकते.
भूकंपाची माहिती मिळाल्यानंतर, अँड्रॉइड सिस्टम तिचे लगेच विश्लेषण करते आणि योग्य असल्यास परिसरातील युजर्सना तत्काळ सतर्कतेचा अलर्ट पाठवते.
आता आपण अँड्रॉइड फोनवर भूकंप अलर्ट सिस्टम कशी सुरू करायची, याची स्टेप बाय स्टेप माहिती समजून घेणार आहोत.
भूकंप अलर्टसाठी अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये किमान Android 5.0 किंवा त्याहून नवीन आवृत्ती असावी, तसेच इंटरनेट आणि जीपीएस चालू असणे आवश्यक आहे.
अँड्रॉइड सेटिंग्जमध्ये जाऊन 'Safety & Emergency' पर्याय निवडा. तो नसेल तर 'Advanced' सेक्शनवर क्लिक करून तिथून शोधा.
यानंतर फोन स्क्रीनवर भूकंप अलर्ट दिसतील; जर बंद असेल तर यूजर्सना ते नक्की सक्रिय करावे.
भूकंप अलर्ट सुरू केल्यावर यूजर्सना भूकंपाची माहिती लगेच मिळेल, ज्यामुळे त्यांना सुरक्षित राहता येईल.