Farmer Killed: तरूण शेतकऱ्याची निर्घृण हत्या; मृतदेहाजवळ रात्रभर वृद्ध आई बसून राहिली, अख्खं गाव हळहळलं

young farmer murdered in shirur : शेतकऱ्याच्या हत्येच्या घटनेनं शिरूर तालुका हादरला. मुलाच्या मृतदेहाजवळ रात्रभर वृद्ध आई बसून राहिली. हे दृश्य बघून अख्खं गाव हळहळलं.
तरूण शेतकऱ्याची मध्यरात्री हत्या, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाजवळ आई रात्रभर बसून राहिली
Farmer killed in Shirur warudesaam tv
Published On
Summary
  • शिरूर तालुक्यातील वरुडे गावात तरुण शेतकरी बाळासाहेब तांबे यांची हत्या

  • रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला

  • वृद्ध आई मुलाच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून राहिली

  • हत्येमागील कारणांचा तपास सुरू

शिरूर तालुक्यातील वरूडे गाव मध्यरात्री हादरला. तरूण शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. बाळासाहेब बबन तांबे असं हत्या झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. त्याची हत्या कोणी केली, कोणत्या कारणांवरून झाली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून, तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी आणि शेतकरी असलेले बाळासाहेब तांबे याची मध्यरात्री हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याची वृद्ध आई मुलाच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून होती. हे हृदयद्रावक दृश्य बघून संपूर्ण गाव हळहळले. असल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहून संपूर्ण गाव हळहळले.

बाळासाहेब याची रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे एक वाजण्याच्या सुमारास हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. बाळासाहेब रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या मृतदेहाजवळ त्याची आई रात्रभर बसून होती. आपल्या लेकराकडे असहाय्य नजरेने बघत बसलेल्या आईची अवस्था बघून गावकरीही हेलावले.

तरूण शेतकऱ्याची मध्यरात्री हत्या, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाजवळ आई रात्रभर बसून राहिली
Beed Crime: तू माझ्याशी का नाही बोलत? चारित्र्याच्या संशयावरून तरुणीवर जीवघेणा हल्ला; घरात घुसून चाकूने सपासप वार, परळी हादरले

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने तिथे पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. बाळासाहेबाची हत्या कोणी केली, त्यामागचं कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती लागली नाही. पोलीस यंत्रणा वेगवेगळ्या शक्यता तपासून बघत आहेत. या घटनेमुळे वरुडे गावासह परिसर हादरून गेले.

तरूण शेतकऱ्याची मध्यरात्री हत्या, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाजवळ आई रात्रभर बसून राहिली
Mumbai Crime: मुंबईमध्ये रक्तरंजित थरार! भरदिवसा चौघांवर जीवघेणा हल्ला, चाकूने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com