Pune Crime : जन्मेठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार; येरवडा कारागृहातील दुसऱ्या घटनेनं खळबळ

Life Term Prisoner Escapes From Yerwada Open Jail Pune: पुण्यातील येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवड्यातील ही दुसरी घटना असून कारागृह सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Security tightened at Yerwada Jail after a life-term prisoner escaped, marking the second such incident in a week.
Security tightened at Yerwada Jail after a life-term prisoner escaped, marking the second such incident in a week.saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: येरवड्यातील खुल्या कारागृहातून एका जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जनार्दन शंकर आडसुळे (रा.काशेवडी, भवानी पेठ) असे फरार झालेल्या कैद्याचे नाव आहे. आडसुळे याच्यावर खडक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कारागृहातील चांगल्या वर्तनामुळे त्याची रवानगी खुल्या कारागृहात करण्यात आली होतो. जिथे तो शेतीचे कामे करत असे.

Security tightened at Yerwada Jail after a life-term prisoner escaped, marking the second such incident in a week.
Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

12 मे रोजी कामावर असताना त्याने सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यांत धूळ फेकत पलायन केले. रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नाही. या प्रकरणी प्रशासनाचे अधिकारी चंद्रकांत सयाजी खांदवे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Security tightened at Yerwada Jail after a life-term prisoner escaped, marking the second such incident in a week.
पुणे मेट्रो टप्पा-१ चा विस्तार होणार; ५.४६ किमी लांब अन् पाच भुयारी स्थानकं, असा असणार स्वारगेट ते कात्रजचा मार्ग

आठवड्यात दुसऱ्यांदा झाली घटना

येरवडा कारागृहातून कैदी पळण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी 8 मे रिजी संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवड, सातारा) या जन्मठेपेच्या कैद्यानेही अशाच प्रकारे पलायन केले होते. भिंगारे याचा अद्याप शोध लागलेला नसताना आडसुळे फरार झाल्याने खळबळ उडाली आहे. फरार दोन्ही आरोपी खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेचे कैदी आहेत. येरवडा पोलीस सध्या या फरार कैद्याचा कसून शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com