सामचा दणका, प्रशासनाला जाग, येरवडा प्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर

Yerwada Mental Hospital Abus Drug Scandal: पुण्यातील येरवडा प्रकरणी साम टीव्हीच्या दणक्यानंतर सरकार अॅक्शन मोडवर आलंय... येरवडा ड्रग्ज प्रकरणी आरोग्य मंत्र्यांनी नेमके काय आदेश दिलेत.... पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Shocking visuals from Yerwada Mental Hospital expose alleged patient abuse and drug-related activities, prompting immediate government action.
Shocking visuals from Yerwada Mental Hospital expose alleged patient abuse and drug-related activities, prompting immediate government action.Saam Tv
Published On

हे दृश्य पाहून हे येरवडा मनोरुग्णालय नाही तर छळछावणी वाटेल...कारण रुग्णांना शौचालय साफ करायला लावून, धुतलेल्या कपड्यांचा गाडा ओढायला लावून छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकाराचा साम टीव्हीनं भांडाफोड केला.... त्यानंतर झोपलेल्या प्रशासनाला जाग आलीय... साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशननंतर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी थेट चौकशीचे आदेश दिलेत....

खरं तर पुण्याच्या येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात मानसिक आजारातून सावरण्यासाठी रुग्ण येतात.. मात्र हे रुग्णालय छळछावणी झाल्याचं साम टीव्हीनं समोर आणलं... रुग्णांचा साफसफाईपासून ते मैला उचलायला लावून छळ केला जात असल्याचं समोर आलं... एवढंच नाही तर रुग्णालयाच्या परिसरात ड्रग्जच्या पुड्या, इंजेक्शनच्या सुया, कंडोम यांसारख्या वस्तू पडलेल्या आढळून आल्या..

त्यामुळे मनोरुग्णालयातील अनागोंदी चव्हाट्यावर आली... यानंतरही मानसिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक सुनीता गेहलोत यांनी येरवडा रुग्णालयाला भेट दिली.. आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.. आता खुद्द आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत.... मात्र या प्रकरणी खरंच सखोल चौकशी होणार का? आणि मनोरुग्णांचा छळ करणाऱ्या, तिथं ड्रग्जचा पुरवठा होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com