पुणे मेट्रो टप्पा-१ चा विस्तार होणार; ५.४६ किमी लांब अन् पाच भुयारी स्थानकं, असा असणार स्वारगेट ते कात्रजचा मार्ग

Pune Metro Swargate To Katraj Underground Project Details: पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्गिकेच्या टनेल सेगमेंट कास्टिंग कामाला सुरुवात झाली असून, प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे.
Tunnel segment casting work begins for Pune Metro’s Swargate–Katraj underground corridor.
Tunnel segment casting work begins for Pune Metro’s Swargate–Katraj underground corridor.saam tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गिकेच्या कामाला वेग आला आहे. या 5.45 किमी लांबीच्या पूर्णतः भुयारी मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या टनेल बोरिंग मशीन साठी लागणाऱ्या पहिल्या टनेल सेगमेंट कास्टिंग कामाचे उद्घाटन करण्यात आले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ झाला. या मार्गिकेचे बांधकाम अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीनद्वारे करण्यात येणार असून बोगद्याच्या मजबूतीसाठी प्रीकास्ट आरसीसी सेगमेंटचा वापर होणार आहे.

Tunnel segment casting work begins for Pune Metro’s Swargate–Katraj underground corridor.
दौंडच्या पहिल्या महिला आमदार यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

स्वारगेट ते कात्रज या दोन्ही बाजूंच्या बोगद्यांची एकूण लांबी सुमारे 9.7 किमीन असून यासाठी एकूण 6,993 रिंग्स तयार केल्या जाणार आहेत. या रिंग्सच्या माध्यमातून बोगद्याची संरचना मजबूत आणि सुरक्षित करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या मार्गिकेवर एकूण पाच भुयारी स्थानके प्रस्तावित आहेत. त्यामध्ये मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बालाजीनगर आणि कात्रज या स्थानकांचा समावेश आहे.

Tunnel segment casting work begins for Pune Metro’s Swargate–Katraj underground corridor.
Aditya Thackeray News | भर मंचावरुन आदित्य ठाकरे यांनी Cm Eknath Shinde यांची ॲक्टींग केली

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असून, शहरातील नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

या मार्गावर एकूण पाच महत्त्वाची भुयारी स्थानके असतील:

१. मार्केट यार्ड

२. बिबवेवाडी

३. पद्मावती

४. बालाजीनगर

५. कात्रज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com