कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी (२ फेब्रुवारी) रात्री गोळीबार केला. पोलीस ठाण्यातच हा धक्कादायक प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली. नेमका हा गोळीबार कशामुळे झाला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत स्वत: आमदार गणपत गायकवाड यांनी माहिती दिली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"महेश गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते माझ्या मुलाच्या अंगावर धावून आले होते. यासाठी पोलीस स्टेशनबाहेर त्यांनी शेकडो मुलं जमा केली होती. हा सगळा प्रकार पाहून मला धक्का बसला. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला", अशी कबुली आमदार गणपत गायकवाड (Mla Ganpat Gaikwad) यांनी माध्यमांसमोर दिली.
आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे पिता-पुत्रांवर देखील गंभीर आरोप केले. "कल्याण पूर्वेत शिंदे बापलेक माझ्यावर अन्याय करत राहिले. माझे करोडो रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यांनी ते परत केले नाहीत. दुसरीकडे मी केलेल्या कामांचं क्रेडिट खासदार श्रीकांत शिंदे घेत होते", असं गणपत गायकवाड म्हणाले. (Latest Marathi News)
कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यात नेहमीच वादावादी तसेच आरोप प्रत्यारोप होत होते. वरिष्ठांनी मध्यस्थ केल्यानंतर देखील दोघांमधील धूसफूस कायम होती . शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले.
हिललाईन पोलीस ठाण्यात दोन्ही नेते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन जमले. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. आमदार गायकवाड यांनी पोलीस निरीक्षणकांसमोरच महेश गायकवाड यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या. यामध्ये महेश गायकवाड यांच्यासह त्यांचा एक सहकारी गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.