US Strikes: अमेरिकेने घेतला जॉर्डन हल्ल्याचा बदला, सीरिया-इराकमधील दहशतवादी तळांवर हल्ला; अनेकांना मारल्याचा दावा

US Air Strikes Latest News: जॉर्डनमधील लष्करी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या सैन्याने शुक्रवारी (२ फेब्रुवारी) सीरिया आणि इराकमधील इराण समर्थित मिलिशियाच्या स्थानांवर हवाई हल्ला केला.
US Air Strikes Latest News
US Air Strikes Latest NewsSaam TV

US Air Strikes Syria-Iraq

जॉर्डनमधील लष्करी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या सैन्याने शुक्रवारी (२ फेब्रुवारी) सीरिया आणि इराकमधील इराण समर्थित मिलिशियाच्या स्थानांवर हवाई हल्ला केला. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. अमेरिकन सैन्याने एका निवेदनातून ही माहिती दिली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

US Air Strikes Latest News
BJP Mla Firing: शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदाराकडून गोळीबार; पोलीस ठाण्यातच घडला थरार, मुंबईत खळबळ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीरियामध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मिलिशियाचे ६ सैनिक मारले गेले आहेत. यातील तिघे गैर-सिरियन होते. या हल्ल्यामुळे अमेरिका सीरिया आणि इराण यांच्यातील वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

गेल्या आठवड्यात जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर ड्रोन हल्ला झाला होता. या हल्ल्यात ३ अमेरिकन सैनिक ठार झाले होते. तर सुमारे ४० जण जखमी झाले होते. या घटनेवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बिडेन संताप व्यक्त केला होता. हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर दिल जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

दरम्यान, अमेरिकेच्या लष्करी हवाई हल्ल्यांमध्ये कमांड आणि कंट्रोल सेंटर, रॉकेट, क्षेपणास्त्र आणि ड्रोन स्टोरेज सुविधा तसेच लॉजिस्टिक आणि दारूगोळा पुरवठा साखळी सुविधांना लक्ष्य करण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकन सैन्याने सीरिया आणि इराणमधील ८५ हून अधिक लक्ष्यांवर १२५ हून अधिक युद्ध सामग्रीसह हल्ले केले. त्याच वेळी, सीरियाच्या सरकारी माध्यमांनी सांगितले की, सीरियाच्या वाळवंटी भागात आणि इराकच्या सीमेजवळ असलेल्या लक्ष्यांवर अमेरिकन हल्ल्यात अनेक लोक ठार आणि जखमी झाले आहेत.

US Air Strikes Latest News
Daily Horoscope: मंगळ-शुक्राच्या संयोगामुळे अनोखा योग; ५ राशींच्या लोकांचे होणार अच्छे दिन सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com