BJP Mla Ganpat Gaikwad Firing Latest News
BJP Mla Ganpat Gaikwad Firing Latest News Saam TV

Mla Ganpat Gaikwad: गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदे पिता-पुत्रांवर केले गंभीर आरोप

Mla Ganpat Gaikwad News: गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले.
Published on

BJP Mla Ganpat Gaikwad Firing Latest News

मुंबईच्या उल्हासनगर परिसरात शुक्रवारी (२ फेब्रुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे हिललाईन पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडला. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BJP Mla Ganpat Gaikwad Firing Latest News
BJP Mla Firing: शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदाराकडून गोळीबार; पोलीस ठाण्यातच घडला थरार, मुंबईत खळबळ

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले.

"माझ्या मुलाच्या अंगावर महेश गायकवाड धावून आले. पोलीस स्टेशनबाहेरही त्यांनी शेकडो मुलं जमा केली होती. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही. म्हणूनच मी गोळीबार केला", असं आमदार गायकवाड यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

"जर माझ्या नजरेसमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील, तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला. मी केलेल्या गुन्ह्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही", असंही आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमांसमोर सांगितलं.

मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप

आमदार गणपत गायकवाड (Mla Ganpat Gaikwad) यांनी शिंदे पिता-पुत्रांवर देखील गंभीर आरोप केले. कल्याण पूर्वेत शिंदे बापलेक माझ्यावर अन्याय करत राहिले. माझे करोडो रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यांनी ते परत केले नाहीत. दुसरीकडे मी केलेल्या कामांचं क्रेडिट खासदार श्रीकांत शिंदे घेत होते. मला राजकीयदृष्ट्या संपविण्याचा डाव शिंदेंनी आखला होता, असं गायकवाड म्हणाले.

BJP Mla Ganpat Gaikwad Firing Latest News
Daily Horoscope: मंगळ-शुक्राच्या संयोगामुळे अनोखा योग; ५ राशींच्या लोकांचे होणार अच्छे दिन सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com