Mumbai local : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल तब्बल अर्धा तास उशिराने, मुंबईकरांचे मेगाहाल

Local train late reason today : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाल्याने मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत. विरार-चर्चगेट मार्गावर लोकल १० ते २५ मिनिटे उशिराने धावत असून गर्दी, प्रवासातील विलंब आणि सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
Mumbai Local
Mumbai Local Saam Tv
Published On

Virar Churchgate local status : पश्चिम रेल्वेने प्रवास कऱणाऱ्या मुंबईकरांना लोकलच्या लेटमार्कचा मोठा फटका बसलाय. बुधवारी सकाळपासूनच लोकल ट्रेनला विलंबाने धावत असल्याच्या तक्रारी येत होत्या. गर्दीच्या वेळी विरार आणि चर्चगेट दरम्यानची लोकल सेवा १० ते २५ मिनिटे उशिराने धावत होती. सध्याच्या घडीला पश्चिम रेल्वेची लोकल २५ मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे. लोकल उशिराने धावत असल्यामुळे दादर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उशिराने धावणाऱ्या लोकलबाबत पश्चिम रेल्वेकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

गर्दीच्या वेळेत मुंबई लोकल ठप्प झाल्याने प्रचंड गर्दी झाली, प्रवासाचा वेळ वाढला आणि सुरक्षिततेच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडून त्वरित कारवाईची मागणी केली. प्रवाशांनी आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केलाय. बुधवारी पहाटेपासून उशिराने पश्चिम रेल्वेच्या लोकल उशिराने धावत होत्या. त्यामुळे हजारो ऑफिसला जाणारे आणि दररोज प्रवास करणारे लोकांना फटका बसला.

Mumbai Local
Gold Rate Today : सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, प्रति तोळा इतक्या रूपयांनी महागलं, वाचा 24K,22K आणि 18K चा दर

विरार-बोरिवलीकडे प्रवास करणाऱ्यांना लोकलच्या लेटमार्कचा मोठा फटका बसलाय. उशिरा येणार्‍या लोकल गाड्या उशिरा येत असल्याने आणि कमी सेवा वेळेवर धावत आहेत. आधीच गर्दी असलेल्या डब्यांमध्ये लोकल उशिरा असल्याने आणखी गर्दी वाढत आहे. लोकल खचाखच भरलेल्या असल्याने अपघाताचा धोका वाढलाय. एका प्रवाशाने सांगितले की, अनेक लोकल स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी झाली आहे. कारण प्रवाशांना नेहमीपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागली. त्यामुळे गाडी आल्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Mumbai Local
NCP : अजितदादांच्या विश्वासू जिल्हाध्यक्षांचं अल्पशा आजाराने निधन, राष्ट्रवादीवर शोककळा

ऑफिसला जाण्यासाठी मुंबईकर घडाळ्याच्या काटा पाहूनच निघतात. दररोज ठरलेल्या लोकल उशिरा येत असल्याने गर्दी वाढत गेली. वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचा रोष वाढला. एका प्रवाशाने सांगितले की, नालासोपारा येथून सकाळी ८.०१ वाजता निघणारी लोकल ट्रेन तब्बल २५ मिनिटे उशिराने धावत होती. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सकाळच्या गर्दीच्या वेळी होणाऱ्या विलंबामुळे कामाचे वेळापत्रक विस्कळीत होते आणि प्रवासाचा ताण वाढला.

Mumbai Local
Ajit Pawar : विमान कोसळण्याआधी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल, १० मिनिटापूर्वी दादा नेमकं काय म्हणाले....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com