मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ३० ते ४० अतिरिक्त लोकल धावणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Western Railway Four New Platforms Between Andheri And Virar: पश्चिम रेल्वेच्या अंधेरी, बोरीवली आणि विरार स्थानकांवर चार नवीन फलाट उभारण्यात येणार आहेत. नव्या सुविधांमुळे अतिरिक्त लोकल फेऱ्यांसाठी रेल्वेची क्षमता वाढणार आहे.
WESTERN RAILWAY
WESTERN RAILWAYsaam tv
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन अंधेरी, बोरीवली आणि विरार स्थानकांवर पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे. या तिन्ही स्थानकांवर एकूण चार नवीन प्लॅटफॉम उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर अंधेरी ते विरारदरम्यान दररोज ३० ते ४० अतिरिक्त लोकल धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून, त्याचा थेट परिणाम लोकलच्या गर्दीवर होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून विद्यमान सुविधांमध्ये वाढ करण्यावर भर दिला जात आहे. नवीन प्लॅटफॉममुळे स्थानकांवरील लोकल हाताळण्याची क्षमता वाढणार असून, भविष्यात अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यास मदत होणार आहे.

WESTERN RAILWAY
Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक बदलणार; घराबाहेर पडण्यापूर्वी नवीन टाइम टेबल घ्या जाणून

बोरीवलीत ३३० मीटरचा प्लॅटफॉम

बोरीवली स्थानकातील प्लॅटफॉम क्रमांक ३ च्या उत्तरेकडे सुमारे ३३० मीटर लांब आणि ७ मीटर रुंद नवीन प्लॅटफॉम उभारला जाणार आहे. हा प्लॅटफॉम होम प्लॅटफॉर्म म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. तसेच अंधेरी आणि विरार स्थानकांमध्ये प्रत्येकी एक नवीन प्लॅटफॉम बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांची लोकल हाताळण्याची क्षमता वाढणार आहे.

WESTERN RAILWAY
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! AC लोकलबाबत रेल्वेमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा; जाणून घ्या पहिली ट्रेन कधी सुरू होणार

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेची क्षमता वाढविण्यासाठी विविध कामे सुरू आहेत. यामध्ये नवीन रेल्वे मार्ग, यार्ड रिमॉडेलिंग आणि स्थानकांवरील अतिरिक्त सुविधांचा समावेश आहे. बोरीवली-विरार पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्पाशी संबंधित फलाट, यार्ड तसेच स्थानक परिसरातील विविध कामेही या विस्ताराचा भाग आहेत.

WESTERN RAILWAY
Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून तरुणाला ढकललं, किरकोळ वादाचा भयानक शेवट

दरम्यान, अंधेरी, बोरीवली आणि विरार ही स्थानके मोठ्या प्रवासी संख्येमुळे कायमच गजबजलेली असतात. उपलब्ध आकडेवारीनुसार अंधेरी स्थानकातून दररोज सुमारे ४.१८ लाख, बोरीवलीतून ४.४८ लाख, तर विरारमधून सुमारे ५.६१ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे नव्या फलाटांमुळे या स्थानकांवरील वाढत्या प्रवासी भाराला हाताळण्यासाठी रेल्वेच्या क्षमतेत वाढ होणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनीही उपनगरीय लोकल सेवेची क्षमता वाढविण्यासाठी ही कामे सुरू असल्याचे सांगितले आहे. नवीन फलाट कार्यान्वित झाल्यानंतर अतिरिक्त लोकल फेऱ्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com