Vishwambhar Choudhari : विश्वंभर चौधरी यांना धक्का; मतदार यादीतून नाव गायब, मतदानाच्या हक्कापासून राहिले वंचित

Vishwambhar Choudhari latest news : मतदारांचं नाव मतदार यादीत नसल्याचे प्रकार घडले आहेत.यात अनेक सेलिब्रिटी, सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. आता यात सामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी यांचाही समावेश झाला.
विश्वंभर चौधरी यांना धक्का; मतदार यादीतून नाव गायब, मतदानाच्या हक्कापासून राहिले वंचित
Vishwambhar ChoudhariSaam tv

नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. पुण्यात आज सोमवारी अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. तर काही ठिकाणी मतदान केंद्रावर मशीन पडल्याच्या घटना घडल्या. तर काही केंद्रावर मतदारांचं नाव मतदार यादीत नसल्याचे प्रकार घडले आहेत. यात अनेक सेलिब्रिटी, सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. आता यात सामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी यांचाही समावेश झाला. त्यांनाही मतदार यादीत नाव गायब झाल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले आहे.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी यांचं नाव मतदार यादीत गायब झालं आहे. चौधरी यांनी दोन मतदान केंद्रावर जाऊन यादीतील नाव तपासलं. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांना नाव आढळलं नाही. वर्षभरापूर्वी विश्वंभर चौधरी यांचं नाव मतदार यादीत होतं.

विश्वंभर चौधरी यांना धक्का; मतदार यादीतून नाव गायब, मतदानाच्या हक्कापासून राहिले वंचित
Parbhani Water Crisis: चिंताजनक! हंडाभर पाण्यासाठी माेजावे लागताहेत पैसे, पेडगावकरांचा ग्रामपंचायतीवर माेर्चा

राज्यभरात घेतल्या होत्या सभा

विश्वभंर चौधरी यांनी वकील असीम सरोदे आणि पत्रकार निखिल वागळे यांच्याबरोबर अनेक ठिकाणी 'निर्भय बनो'च्या सभा घेतल्या होत्या. त्यांनी सत्ताधारी भाजप, महायुतीच्या विरोधात सभा घेतल्या होत्या. या सभेमुळे निखिल वागळे, विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.

विश्वंभर चौधरी यांना धक्का; मतदार यादीतून नाव गायब, मतदानाच्या हक्कापासून राहिले वंचित
Pune Lok Sabha : प्रॉपर्टी टॅक्सच्या पावत्यांमध्ये नाव येतं, मग मतदार यादीत का नाही? आजीबाई संतापल्या

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात मतदान पार पडत असताना त्यांचं नाव यादीतून गायब असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे मतदार यादीतून नाव गायब असल्याने चौधरी यांना मोठा धक्का बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com