Pune Lok Sabha : प्रॉपर्टी टॅक्सच्या पावत्यांमध्ये नाव येतं, मग मतदार यादीत का नाही? आजीबाई संतापल्या

pune lok sabha constituency News :काही ठिकाणी मतदादारांची नावे नसल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारावरून एक पुणेरी आजी मतदार यादीत नाव नसल्यामुळे चिडल्या.
प्रॉपर्टी टॅक्सच्या पावत्यांमध्ये नाव येतं, मग मतदार यादीत का नाही? आजीबाई संतापल्या
Pune Lok SabhaSaam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : राज्यातील ११ मतदारसंघासहित पुणे लोकसभा मतदारसंघात देखील मतदान सुरु आहे. पुण्यातील शेकडो नागरिक मतदानासाठी सकाळपासून मतदानसाठी बाहेर पडले आहेत. मात्र, आजच्या मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. मतदारसंघात काही केंद्रावर मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी मतदादारांची नावे नसल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारावरून एक पुणेरी आजी मतदार यादीत नाव नसल्यामुळे चिडल्या.

पुण्यात आज सर्वत्र लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, काही नागरिकांचा मतदान केंद्रावर हिरमोड झाल्याच्या देखील घटना घडल्या. त्यात सेलिब्रिटी मंडळीचा देखील सामावेश आहे. तर एका पुणे आजीचंही मतदार यादी नाव नव्हतं. यामुळे संतापलेल्या आजीबाईने खोचक प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला.

प्रॉपर्टी टॅक्सच्या पावत्यांमध्ये नाव येतं, मग मतदार यादीत का नाही? आजीबाई संतापल्या
Fourth Phase Voting : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान, राज्यातील 11 जागांवर मतदार देणार कौल

पुणेकर आजीबाई म्हटल्या की, प्रॉपर्टी टॅक्स भरल्याचा पावत्या आहेत. तेव्हा माझं नाव हे व्यवस्थित यादीत येतं. मग आता का नाही? असा खोचक प्रश्न पुणेकर आजी यांनी विचारला. निलिमा जोशी असं या आजीचे नाव आहे.

निलिमा जोशी या आज सकाळी पुण्यातील कोथरूड भागात असलेल्या मतदान केंद्रावर पोहोचल्या. त्यावेळी त्यांना घरातील सर्व सदस्यांची नावे दिसली. मात्र, त्यांचं नाव यादीत नव्हतं. त्यामुळे त्या बिचाऱ्या हताश झाल्या.

प्रॉपर्टी टॅक्सच्या पावत्यांमध्ये नाव येतं, मग मतदार यादीत का नाही? आजीबाई संतापल्या
Suyash Tilak: मला तो हक्क बजावता आला नाही, मतदान करता न आल्यामुळे सुयश टिळकने व्यक्त केली खंत

...मग मतदार यादीत नाव का नाही? आजीबाईचा सवाल

'मी प्रत्येक वेळी मतदान करते. मात्र, असं कधीच झालं नाही. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. प्रॉपर्टी टॅक्स भरल्याच्या देखील पावत्या आहेत. त्यावेळी माझं नाव बरोबर येतं. मग आता का नाही? असा सवाल करत या आजीबाईंनी संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com