Dombivali
DombivaliSaam

Dombivali: डोंबिवलीत रिक्षावाल्यांची मनमानी, प्रवाशांशी अरेरावी करत घातला वाद; VIDEO व्हायरल

Passengers Face Abuse from Rickshaw Drivers: डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी आणि दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. दोन रिक्षाचालक प्रवाशाशी वाद घालत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Published on

डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी आणि दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. दोन रिक्षाचालक प्रवाशाशी वाद घालत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रिक्षाचालकांची अरेरावी थेट कॅमेऱ्यात कैद झाली असून, डोंबिवलीतील रिक्षाचालकांचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Dombivali
मिरजेत २ गटात वाद अन् नंग्या तलावारी नाचवून दहशत; VIDEO व्हायरल होताच पोलिसांकडून कारवाई | Miraj

व्हायरल व्हिडिओमध्ये एक प्रवासी रिक्षामध्ये बसलेला दिसतो. काही वेळातच रिक्षाचालक त्याच्याशी उद्धटपणे बोलायला लागतो आणि जबरदस्तीने त्याला रिक्षाबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र प्रवाशाने तत्काळ कॅमेरा ऑन करताच, अरेरावी करणारा रिक्षाचालक तेथून पळून जातो. त्यानंतर प्रवासी दुसऱ्या रिक्षात बसतो, मात्र तेथेही रिक्षाचालकाची अरेरावी सुरूच राहते, हे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.

Dombivali
Mhada Lottery: दिवाळीपूर्वी हक्काचं घर होणार! म्हाडा वर्षभरात राज्यात १९,४९७ घरे बांधणार; मुंबईकरांना विशेष फायदा

या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत रिक्षाचालकांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अशा बेजबाबदार रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com