मिरजेत २ गटात वाद अन् नंग्या तलावारी नाचवून दहशत; VIDEO व्हायरल होताच पोलिसांकडून कारवाई | Miraj

Video of Miraj Land Dispute Brawl Goes Viral: मिरज येथील मंगळवार पेठ परिसरातील माळी गल्लीत घराच्या जागेच्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. वादादरम्यान काही तरुणांनी तलवार काढून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
MIraj
MIrajSaam Tv News
Published On

विजय पाटील, साम टीव्ही

मिरजेतील मंगळवार पेठ परिसरातील माळी गल्लीत घर जागेच्या वादातून दोन गटात जोरदार राडा झाला. वादादरम्यान काही तरूणांनी तलवार काढून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळी गल्लीत राहणाऱ्या २ गटांमध्ये घराच्या जागेवरून जुना वाद सुरू होता. त्याच वादाला आज उधाण आले. एका गटातील काही तरूणांनी तलवार हातात घेऊन दुसऱ्या गटाला धमकावण्याचा प्रयत्न केला. ही घटन एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केली. तसेच सोशल मीडियात व्हायरल केली. पाहता पाहता हा व्हिडिओ काही क्षणात व्हायरल झाला.

MIraj
ड्रायव्हरकडून बलात्कार अन् VIDEO काढून ब्लॅकमेल, ५ मित्रांकडून आळीपाळीनं लैंगिक अत्याचार; पीडितेनं अखेर.. | Crime

घटनेची माहिती मिळताच मिरज शहरात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने वादात सहभागी झालेल्या काही तरूणांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, वादग्रस्त परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

MIraj
Siddaramaiah: सीएमच्या विधानाची थेट पाकिस्तानी मीडियात हेडलाईन; भाजपने उडवली खिल्ली, म्हणाले 'पाकिस्तान रत्न द्या'..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com