ड्रायव्हरकडून बलात्कार अन् VIDEO काढून ब्लॅकमेल, ५ मित्रांकडून आळीपाळीनं लैंगिक अत्याचार; पीडितेनं अखेर.. | Crime

Dehradun Police Register Case Against 6 for physically assaulting and Blackmail: उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये एका ड्रायव्हरने तरुणीवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिच्या व्हिडिओच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल केलं. त्यानंतर, आरोपीच्या पाच मित्रांनीही त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केला.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

देशात गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. अशातच उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ड्रायव्हरने तरुणीवर बलात्कार केला आणि त्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल केलं. मुख्य म्हणजे आरोपीच्या पाच मित्रांनीही त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी तरूणीने आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने तिच्या तक्रारीत म्हटलं की, समीर अब्बास नावाचा युवक तिचा ड्रायव्हर होता. २६ डिसेंबर २०२० साली आरोपीने कोल्ड्रिंकमध्ये नशेचे पदार्थ मिसळून तरूणीला प्यायला दिलं. नंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करताना नराधमाने तिचा व्हिडिओही शूट केला. व्हिडिओचा वापर करून आरोपी तरूणीला वारंवार ब्लॅकमेल करू लागला.

Crime News
Royal Enfield Bullet १९८६ मध्ये किती रूपयांना होती? बिल पाहून धक्का बसेल | Viral

आरोपी इतक्यावरच नाही थांबला. त्याने ब्लॅकमेल करत आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याच्या मित्रांनीही आरोपीवर बलात्कार केला. एकूण ६ जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दीपा शुक्ला नावाच्या महिलेनं आरोपींना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.

Crime News
Kalyan Crime: केळीच्या बंडलवरून वाद; तरूणाकडून भरदिवसा कुटुंबावर कैचीनं वार; मार्केटमध्ये राडा

या प्रकरणाला कंटाळून अखेर महिलेनं पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलिसांना आपबिती सांगितली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करून आरोपींचा शोध घेत आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com