Viral Video: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर रोमँटिक झालं जोडपं, किस करताना व्हिडिओ व्हायरल

Viral Kissing Video : या व्हायरल व्हिडिओमध्ये मुंबईतील मरीन ड्राईव्हवर एक जोडपं एकमेकांना किस करताना दिसत आहे.
Couple Kissing Video
Couple Kissing Videosaam tv

Couple Kissing Video : मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर अनेक जोडपी फिरायला येतात. येथे अलेल्या जोडप्यांचे प्रेम काही वेळा कॅमेऱ्यात कैद होते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये मुंबईतील मरीन ड्राईव्हवर एक जोडपं एकमेकांना किस करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओत दिसणारे तरुण तरुणी त्यांच्या रोमान्सच्या दुनियेत हरवलेले दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करत ते एकमेकांना अलिंगण देताना आणि किस करताना दिसत आहे. या व्हिडिओत त्यांच्या शेजारी तिथे इतरही अनेक जोडपी बसलेली दिसत आहे.

Couple Kissing Video
Nashik News : नाशिकमध्ये चक्क महिलेने चोरली दुचाकी, घटना CCTV मध्ये कैद, पाहा व्हिडिओ

अरबी समुद्राच्या काठावर असलेल्या मुंबईचा मरिन ड्राइव्ह पर्यटकांसाठी अतिसय प्रसिद्ध ठिकाण आहे. याठिकाणी मुंबईतील अनेक जोडपी आपला खास वेळ घालवण्यासाठी येतात. विशेषत: सायंकाळी या ठिकाणी पर्यटकांची संख्या जास्त असते. आकर्षक रोषणाईमुळे मरीन ड्राइव्ह रात्री खूप सुंदर दिसते. त्यामुळे अनेक लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी जातात.

मरीन ड्राइव्हला कपल पॉइंट म्हणूनही ओळखले जाते. याठिकाणी अनेक जोडपी क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी येतात. मरीन ड्राईव्हवर अनेकदा कपल्स रोमान्स करताना देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एका जोडप्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात ते जगाची पर्वा न करता किस करताना दिसत आहे.

Couple Kissing Video
Kadave Khind Accident : कादवे खिंडीत रानडुकराच्या हल्ल्यानंतर धावती रिक्षा थेट खोल दरीत कोसळली; १ भाविक ठार, ३ जखमी

हा व्हायरल व्हिडिओ @Viral Baba नावाच्या युजरने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या हॅन्डलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे. अनेक यूजर्स हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात यूजर्संनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. असाच एक व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यात एक जोडपे मरीन ड्राइव्हजवळच्या रस्त्यावर एकमेकांना किस करताना दिसले होते. (Mumbai News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com