Vidhyanand Bapat: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...; विद्यानंद बापटांची मराठी सोप्या भाषेत घ्या समजून

Vidhyanand Bapat Marathi Language: पुण्यातील गणेशोत्सवात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या मराठी भाषेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
Vidhyanand Bapat: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...; विद्यानंद बापटांची मराठी सोप्या भाषेत घ्या समजून
Vidhyanand BapatSaam Tv
Published On
  • पुण्यातील तरुण विद्यानंद बापट चर्चेत

  • विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवातील डीजेला केला विरोध

  • विद्यानंद बापट यांच्या मराठीची होतेय चर्चा

  • त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सागर आव्हाड, पुणे

डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले विद्यानंद बापट सध्या त्यांच्या भूमिके बरोबरच शुद्ध, संस्कृतप्रचुर आणि प्रभावी मराठी भाषेमुळेही चर्चेचा विषय ठरले आहेत. बापट यांच्या बोलण्यात येणारे अवघड शब्द, त्यांचे नेमके अर्थ आणि श्लोक-सुभाषितांचे दाखले सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत. त्यांच्या मराठी भाषेविषयीचे वेगवेगले मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विद्यानंद बापट यांच्या वक्तव्यातील ‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्’ हे सुभाषित विशेष चर्चेत आले आहे. साधारण अर्थ असा की, प्रसिद्धी मिळवण्यासाठी हास्यास्पद अथवा लाजिरवाण्या कृती करण्याची प्रवृत्ती यावर या सुभाषितातून उपरोध केला जातो. त्यामुळे सध्याच्या उत्सव संस्कृतीवर टीका करताना बापट यांनी या सुभाषिताचा वापर केल्याचे दिसून येते.

Vidhyanand Bapat: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...; विद्यानंद बापटांची मराठी सोप्या भाषेत घ्या समजून
Pune News: पुण्यात चाललंय तरी काय? खड्ड्यांवर बोलाल तर जेलमध्ये जाल, यूट्युबर संतोष पंडित यांना अटक

विद्यानंद बापट यांच्या भाषणातील ‘ध्वनीप्रदूषण’, ‘सॉफ्ट हिंसाचार’, ‘उत्सवांची दहशत’, ‘संयम’, ‘विवेक’ यांसारख्या शब्दांमधून त्यांची भूमिका स्पष्ट होते. त्यांच्यामते सार्वजनिक उत्सव साजरे करताना इतर नागरिकांच्या शांततेचा आणि सुरक्षिततेचा विचार होणे आवश्यक आहे.त्यांच्या भाषेतील संस्कृतप्रचुर शब्दांमुळे अनेकांना शब्दांचे अर्थ शोधावे लागत असले, तरी याच वैशिष्ट्यामुळे त्यांची वक्तृत्वशैली वेगळी ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बापट यांच्या मराठी भाषेचे कौतुक केले आहे.

Vidhyanand Bapat: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...; विद्यानंद बापटांची मराठी सोप्या भाषेत घ्या समजून
Vidhyanand Bapat: गणेशोत्सवाला विरोध नाहीच, हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणत्या मुद्द्यावर काय म्हणाले?

शब्दांचा अर्थ -

ध्वनीप्रदूषण – मर्यादेपेक्षा जास्त आणि त्रासदायक आवाजामुळे होणारे प्रदूषण.

संयम – स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची वृत्ती.

विवेक – योग्य-अयोग्य यातील फरक ओळखण्याची बुद्धी.

सुभाषित – अर्थपूर्ण, बोध देणारे आणि अनुभवातून आलेले वचन.

उपरोध – एखाद्या गोष्टीवर टोमणात्मक किंवा व्यंगात्मक पद्धतीने केलेली टीका.

Vidhyanand Bapat: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...; विद्यानंद बापटांची मराठी सोप्या भाषेत घ्या समजून
Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com