Pune : तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले, निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू

Pune Lieutenant General Ashok Joshi Death News : भारतीय लष्करातील निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचे पुण्यात निधन झाले. साळुंखे विहार येथील इमारतीच्या गच्चीवरून पडल्याची घटना.
 indian army retired officer ashok joshi dies
indian army retired officer ashok joshi diesAI Image
Published On: 
Summary
  • पुण्यातील साळुंखे विहार परिसरात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचे निधन

  • बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली घटना

  • उन्हात बसण्यासाठी गच्चीवर गेले असता चक्कर येऊन पडल्याने मृत्यू

  • रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

भारतीय लष्करात महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेले निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचे निधन झाले आहे. पुण्यातील साळुंखे विहार परिसरात राहत्या इमारतीच्या गच्चीवरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे लष्करी क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक जोशी हे पुण्यातील साळुंखे विहार येथील एका निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होते. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी घरकाम करणाऱ्या व्यक्तीला थंडी वाजत असल्याने गच्चीवर जाऊन थोडा वेळ उन्हात बसणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ते गच्चीवर गेले.

 indian army retired officer ashok joshi dies
UPI व्यवहाराबाबत मोठी बातमी! B2B व्यवहारासाठी द्यावे लागणार फक्त ५ रुपये शुल्क

काही वेळाने इमारतीच्या परिसरात जोशी पडलेल्या अवस्थेत आढळून आले. ही बाब लक्षात येताच रहिवाशांनी तातडीने त्यांच्या घरातील काम करणाऱ्या व्यक्तीला याची माहिती दिली. घटनेची बातमी समजताच त्यांच्या मुलीने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 indian army retired officer ashok joshi dies
Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा २७८० रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी संबंधित माहिती घेतली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे ही घटना घडली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी त्यांच्या मुलीचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, अशोक जोशी यांना यापूर्वीही चक्कर येण्याचा त्रास होत होता. काही वेळा ते घरातही पडले होते. त्यामुळे गच्चीवरून पडण्यामागे चक्कर येणे हे कारण होते का, याचाही तपास केला जात आहे.

 indian army retired officer ashok joshi dies
Moss Removal : घराच्या गच्चीवर, अंगणात आणि भिंतींवर शेवाळ साचलंय? जाणून घ्या शेवाळ काढण्याचे सोपे घरगुती उपाय

अशोक जोशी यांनी भारतीय लष्करात दीर्घकाळ सेवा बजावली होती. १९६५ आणि १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच त्यांनी लष्करात 'डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ट्रेनिंग' हे महत्त्वाचे पदही सांभाळले होते. त्यांच्या पश्चात मुलगी आणि जावई असा परिवार आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या एका ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या निधनाने शोक व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.