Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा २७८० रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold Silver Price Today News : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सोन्याच्या दरात प्रति तोळा २,७८० रुपयांची घसरण झाली असून १० ग्रॅम सोन्याचा भाव १,३३,२६० रुपयांवर पोहोचला आहे.
Gold Silver Rate Today News
Gold Silver Rate Today News AI Image
Published On: 

सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असून, आता सोन्याच्या किमतीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे सणासुदीला किंवा लग्नकार्यासाठी दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या दराने प्रति १० ग्रॅम १ लाख ५० हजार रुपयांचा आकडा पार केला होता. सोन्याचे दर सतत वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले होते. मात्र, आता दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे.

सोन्याच्या किमतीत प्रति तोळा २ हजार ७८० रुपयांची घट झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचा दर १ लाख ३३ हजार २६० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना पूर्वीच्या तुलनेत कमी पैसे मोजावे लागणार आहेत. केवळ सोन्याचे दरच नव्हे, तर चांदीच्या किमतीतही बदल पाहायला मिळत आहे. गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, सध्या १०० ग्रॅम चांदीचा भाव १८ हजार ५०० रुपये इतका आहे. दरम्यान, आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी बदल होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती, ग्राहकांची मागणी आणि पुरवठा यावर या किमती अवलंबून असतात. त्यामुळे सोन्याचे दर आणखी कमी होणार की पुन्हा वाढणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Gold Silver Rate Today News
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! पुन्हा ई-केवायसी प्रक्रियेला सुरुवात; १५०० रुपये कधी मिळणार?

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,३२६

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०६,६०८

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३३,२६०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,३२,६००

Gold Silver Rate Today News
Kitchen Hacks : फ्रिजमध्ये ठेवूनही कोंथिंबीर सुकतेय? 'या' टिप्सनं कोथिंबीर राहील हिरवीगार

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,२१५

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९७,७२०

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२२,१५०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,२१,५००

Gold Silver Rate Today News
Bribe Case : पोलीस दलात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,९९४

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ७९,९५२

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९९,९४०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,९९,४००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.