Kitchen Hacks : फ्रिजमध्ये ठेवूनही कोंथिंबीर सुकतेय? 'या' टिप्सनं कोथिंबीर राहील हिरवीगार

Fresh Coriander Storage Kitchen Hacks : फ्रिजमध्ये ठेवूनही कोथिंबीर दोन दिवसांत सुकते किंवा पिवळी पडते? मग वापरा हे सोपे घरगुती उपाय. टिश्यू पेपर आणि योग्य साठवण पद्धतीने कोथिंबीर अनेक दिवस ताजी आणि हिरवी ठेवण्याची ट्रिक जाणून घ्या.
Fresh Coriander Storage Kitchen Hacks
Fresh Coriander Storage Kitchen HacksAI Image
Published On: 

कोथिंबीर हा आपल्या रोजच्या स्वयंपाकातील महत्त्वाचा पदार्थ आहे. भाजी असो, आमटी, वरण किंवा चटणी, कोथिंबीर घातल्याशिवाय पदार्थाला छान चव आणि सुगंध येत नाही. त्यामुळे अनेकजण बाजारातून आठवड्याभराची कोथिंबीर एकाच वेळी आणतात. मात्र, फ्रिजमध्ये ठेवूनही कोथिंबीर दोन ते तीन दिवसांत सुकू लागते. तिची पाने पिवळी पडतात आणि काही वेळा कुजून जातात. त्यामुळे विकत आणलेली कोथिंबीर फेकून द्यावी लागते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही कोथिंबीर अनेक दिवस ताजी ठेवू शकता.

बाजारातून कोथिंबीर आणल्यानंतर सर्वप्रथम तिची निवड करा. त्यातील पिवळी पडलेली, सुकलेली आणि खराब झालेली पाने काढून टाका. मुळांना जास्त माती लागली असेल, तर ती हलक्या हाताने स्वच्छ करा. कोथिंबीर लगेच धुऊन फ्रिजमध्ये ठेवू नका. कारण पानांवर पाणी राहिल्यामुळे ती लवकर खराब होऊ शकते. धुवायची असल्यास आधी ती पूर्णपणे सुकू द्या.

Fresh Coriander Storage Kitchen Hacks
Winter Diet : हिवाळ्यात वारंवार भूक का लागते? जेवणानंतरही काहीतरी खाण्याची इच्छा होतेय? जाणून घ्या कारणं

कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर हा एक सोपा उपाय आहे. यासाठी एक स्वच्छ आणि कोरडा डबा घ्या. डब्याच्या तळाशी टिश्यू पेपर ठेवा. त्यावर कोथिंबीर पसरवून ठेवा. त्यानंतर वरूनही एक टिश्यू पेपर ठेवा आणि डब्याचे झाकण बंद करा. टिश्यू पेपर पानांमधील अतिरिक्त ओलावा शोषून घेतो. त्यामुळे कोथिंबीर लवकर कुजत नाही.

Fresh Coriander Storage Kitchen Hacks
Blood Sugar:  शुगर कंट्रोल करण्याचा सर्वात सोपा उपाय! रात्री खोलीत 'ही' एक गोष्ट , रक्तातील साखर राहील एकदम नॉर्मल

अनेकजण कोथिंबीर बाजारातून आणल्यानंतर थेट प्लास्टिकच्या पिशवीत भरून फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र, पिशवीमध्ये ओलावा साचल्यामुळे पाने लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे कोथिंबीर नेहमी स्वच्छ आणि कोरड्या डब्यात ठेवणे चांगले. कोथिंबीर ठेवलेल्या डब्यातील टिश्यू पेपर दर दोन ते तीन दिवसांनी तपासा. तो ओलसर झाला असल्यास लगेच बदला. तसेच डब्यात एखादे पान खराब झालेले दिसल्यास ते काढून टाका. या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास कोथिंबीर अधिक काळ ताजी आणि हिरवी ठेवण्यास मदत होईल. त्यामुळे कोथिंबीर वारंवार विकत आणण्याची गरजही कमी होईल आणि अन्नाची नासाडी टाळता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.