Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! पुन्हा ई-केवायसी प्रक्रियेला सुरुवात; १५०० रुपये कधी मिळणार?

Maharashtra Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी मोठी बातमी! आजपासून ई-केवायसी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जाणून घ्या संपूर्ण अपडेट.
Maharashtra Ladki Bahin yojana News
Maharashtra Ladki Bahin yojana NewsAI image
Published On: 

नंदुरबार, सागर निकवडे

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया महत्त्वाची आहे. आता लाभार्थी महिलांसाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार या संदर्भात कोणतीही तारीख समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, योजनेचा लाभ योग्य महिलांपर्यंत पोहोचावा आणि लाभार्थ्यांची माहिती तपासता यावी, यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या महिलांनी अद्याप आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. ई-केवायसी करताना आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी. तसेच आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत.

Maharashtra Ladki Bahin yojana News
RBI Bank : RBI चा फायनान्स कंपन्यांना मोठा दणका; ६३ कंपन्यांचे परवाने रद्द

ही प्रक्रिया जरी आजपासून सुरु करण्यात आली असली तरी, प्रक्रिया सुरू होताच अधिकृत वेबसाइटवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ई-केवायसी करण्यासाठी अनेक महिला अधिकृत वेबसाइटवर जात आहेत. त्याठिकाणी आधार क्रमांक टाकल्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी पाठवला जातो. मात्र, अनेक महिलांना हा ओटीपी मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे पुढील प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही.

Maharashtra Ladki Bahin yojana News
Cancer : उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊनही पुन्हा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या लक्षणे

विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने महिलांनी एकाच वेळी वेबसाइटवर प्रवेश केल्यामुळे सर्व्हरवर ताण निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे वेबसाइट संथ गतीने सुरू असून काही वेळा ती व्यवस्थित उघडत नसल्याचेही सांगितले जात आहे. या अडचणींचा सर्वाधिक त्रास ग्रामीण भागातील महिलांना होत आहे.

Maharashtra Ladki Bahin yojana News
Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं २,२०० रुपयांनी तर चांदी ८ हजारांनी स्वस्त

अनेक महिला ई-केवायसी करण्यासाठी महा ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्रांवर जात आहेत. मात्र, तिथेही ओटीपी येत नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. केंद्र चालकांनाही या समस्येमुळे महिलांना मदत करताना अडचणी येत आहेत. दरम्यान, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिला प्रयत्न करत असल्या तरी तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वेबसाइटमधील समस्या लवकरात लवकर दूर करावी, अशी मागणी लाभार्थी महिलांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.