Cancer : उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊनही पुन्हा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या लक्षणे

Cancer Awareness : कॅन्सरवरील उपचारानंतर पुन्हा आजार होऊ शकतो का? दिल्लीतील महिलेच्या दुर्मीळ प्रकरणातून जाणून घ्या कॅन्सर पुन्हा होण्याचे प्रकार, संभाव्य लक्षणे, उपचार आणि नियमित तपासणीचे महत्त्व.
Symptoms of cancer recurrence after treatment
Symptoms of cancer recurrence after treatmentAI image
Published On: 

कॅन्सरवर उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबीयांना सर्वात मोठा दिलासा मिळतो. मात्र, भविष्यात हा आजार पुन्हा उद्भवणार तर नाही ना, अशी भीतीही मनात असते. विशेष म्हणजे कॅन्सर पुन्हा होण्यासाठी कोणताही ठरावीक कालावधी नसतो. काही रुग्णांमध्ये उपचारानंतर काही महिन्यांतच कॅन्सर परत येऊ शकतो, तर काहींमध्ये अनेक वर्षांनंतर त्याची लक्षणे दिसतात.

दिल्लीतील एका महिला रुग्णाला १० वर्षांनी पुन्हा कॅन्सर झाल्याची माहिती आहे. या महिलेचे बालपणी दोन्ही डोळ्यांमध्ये रेटिनोब्लास्टोमा म्हणजेच डोळ्यांच्या पडद्याचा कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीसारखे उपचार करण्यात आले. उपचारांनंतर ती जवळपास १० वर्षे कॅन्सरमुक्त होती. मात्र, १० वर्षांनंतर पुन्हा या महिलेच्या पायाच्या हाडामध्ये पुन्हा कॅन्सरची गाठ आढळली. एम्सच्या डॉक्टरांनी तपासणीनंतर हा मेटास्टेटिक रेटिनोब्लास्टोमा असल्याचे स्पष्ट केले. सुरुवातीच्या उपचारांचा अपेक्षित फायदा न झाल्याने डॉक्टरांनी रेडिओथेरपीचा पर्याय निवडला. या उपचारांमुळे महिलेला पुन्हा कॅन्सरवर मात करता आली.

Symptoms of cancer recurrence after treatment
Blood Sugar:  शुगर कंट्रोल करण्याचा सर्वात सोपा उपाय! रात्री खोलीत 'ही' एक गोष्ट , रक्तातील साखर राहील एकदम नॉर्मल

डॉक्टरांच्या मते, कॅन्सर पुन्हा उद्भवण्याचे तीन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात आधी ज्या ठिकाणी कॅन्सर होता, त्याच ठिकाणी तो परत येतो. याला लोकल रिकरन्स म्हणतात. दुसऱ्या प्रकारात आजूबाजूच्या लिम्फ नोड्समध्ये कॅन्सर पसरतो. याला रीजनल रिकरन्स म्हणतात. तर तिसऱ्या प्रकारात शरीराच्या दुसऱ्या अवयवामध्ये कॅन्सर आढळतो. याला डिस्टंट रिकरन्स म्हणतात. शरीरावर नवीन गाठ येणे, सतत वेदना होणे, वजन अचानक कमी होणे, सतत खोकला येणे, असामान्य रक्तस्राव, वारंवार ताप येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे ही काही संभाव्य लक्षणे आहेत. मात्र, या लक्षणांचा अर्थ कॅन्सर परत आला असाच होत नाही. त्यामुळे अशी लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Symptoms of cancer recurrence after treatment
RBI Bank : RBI चा फायनान्स कंपन्यांना मोठा दणका; ६३ कंपन्यांचे परवाने रद्द

कॅन्सरचा प्रकार आणि रुग्णाची प्रकृती पाहून डॉक्टर उपचार ठरवतात. यामध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी, इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपीचा समावेश असू शकतो. त्यामुळे उपचार पूर्ण झाल्यानंतरही नियमित तपासण्या करणे आणि शरीरातील बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.