
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलीय. आरोपी राजेंद्र हगवणेला आसरा देणाऱ्या ५ जणांना पुणे न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी सुनावलीय. यात एका माजी मंत्र्याच्या मुलाचाही देखील यात समावेश आहे. कर्नाटकातील माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याची तुरुंगात रवानगी करण्यात आलीय.
प्रीतम पाटीलसह मावळमधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक, साताऱ्यातील राहुल जाधव, अमोल जाधव, तळेगाव येथील मोहन भेगडे यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणेला आसरा देणाऱ्या पाच जणांना बावधन पोलिसांनी रविवारी अटक केली होती. यात कर्नाटकातील माजी मंत्र्यांच्या मुलाचा देखील समावेश आहे. मंत्र्याच्या मुलासह इतर पाच जणांना आज न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
त्यावेळी पोलिसांनी न्यायायलाकडे आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. हगवणे यांना कोणती आर्थिक मदत केली आहे का? हे अजून तपासण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाला विनंती केली होती. आश्रय द्यायला कोणी मदत केली आहे का? हे तपासायचे आहे, असं देखील पोलीस यांनी न्यायालयात सांगितलं. मात्र गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली.
वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झालाय. वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा आढळल्यात. त्यामधील १५ जखमा या २४ तासांच्या आतल्या आहेत. त्यामुळे तिचा मारहाण करून खून करण्यात आला. असा आरोप अनिल कस्पटे यांनी आरोप केलाय. कस्पटे यांच्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात पोलीस तपासाची कोणतीही माहिती आम्हाला देत नाही, असं देखील त्यांनी सांगितलंय.
निलेश चव्हाणला अटक करण्यात का येत नाही?, असा सवालही अनिल कस्पटे यांनी पोलीस यंत्रणेला केलाय. वैष्णवी हगवणे प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडियाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र अजूनही आमच्या मागणीला शासनाने कोणतीही दाद दिली नाही.', असा दावाही त्यांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.