Midnight Shootout: ... तर त्याच्या पायावर गोळी मारायची; अमोल खोतकरच्या एन्काऊंटरनंतर बहिणीचे पोलिसांवर गंभीर आरोप

Amol Khotkar Encounter: संभाजीनगरमध्ये दरोडेखोर अमोल खोतकरचा पोलिसांनी मध्यरात्री एन्काऊंटर केला. अमोल खोतकरने पोलिसांवर गोळीबार करत अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या
Sambhajinagar Shootout: ... तर त्याच्या पायावर गोळी मारायची; अमोल खोतकरच्या एन्काऊंटनंतर बहिणींचे पोलिसांवर गंभीर आरोप
Sambhajinagar ShootoutSaam Tv
Published On

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोड्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकरचा एन्काऊंटर करण्यात आला होता. या एन्काऊंटरवर अमोलच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेत पोलिसावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी अमोलची हत्या केल्याचा असा आरोप त्याचे वडील बाबुराव खोतकर यांनी केलाय. तर 'माझ्या भावाचा खून होणार होता त्याने अगोदरच सांगितलं होतं.', असं अमोल खोतकर याच्या बहिणीने सांगितले. अमोलच्या बहिणींनी पोलिसांवर केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

अमोलच्या बहिणीने या एन्काऊंटरप्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित करत पोलिसांवर आरोप केले आहे. ती म्हणाली की, 'माझ्या भावाला का मारले? एन्काऊंटर का केले? जर तो पळून जात असेल किंवा तो गोळीबार करत असेल त्याच्या पायावर गोळी घातली पाहिजे होती. त्याला गोळ्या मारल्यात. शरीरावर सगळीकडे गोळ्या मारल्याचे दिसून आले. त्याच्या डोळ्यातून रक्त आले आहे.' तसचं, 'माझा भाऊ अगोदरपासूनच सांगत होता की माझा खून होईल, कोणीतरी मोठा माणूस माझी सुपारी देईल. आता आम्हाला न्याय द्या. मी इथून उठणार नाही.', असा आक्रमक पवित्रा अमोलच्या बहिणीने घेतला आहे.

Sambhajinagar Shootout: ... तर त्याच्या पायावर गोळी मारायची; अमोल खोतकरच्या एन्काऊंटनंतर बहिणींचे पोलिसांवर गंभीर आरोप
Crime News: बायको अन् बॉयफ्रेंडचा बेडवर रोमान्स, नवऱ्यानं रंगेहाथ पकडलं; संतापून पत्नीनं तलवारीनं पतीला संपवलं

तर, 'पोलिसांनी दोन ते तीन करोड रुपये घेतले. पोलिसांनी अमोलचा खून केला आहे. व्हिडिओ शूटिंगमध्ये पोस्ट मोर्टम झाले पाहिजे. किती गोळ्या लागल्या ते कळाले पाहिजे.', अशी मागणी अमोलच्या वडिलांनी केली आहे. अमोलची बहीण आणि वडिलांना संभाजीनगर पोलिसांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि आरोपांमुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

Sambhajinagar Shootout: ... तर त्याच्या पायावर गोळी मारायची; अमोल खोतकरच्या एन्काऊंटनंतर बहिणींचे पोलिसांवर गंभीर आरोप
Crime : ५० पेक्षा जास्त तरुणींवर अत्याचार, ३ हजारांहून अधिक...; वासनेने पेटलेला ट्रॅक्सी ड्रायव्हर अखेर कसा पकडला गेला?

दोन आठवड्यांपूर्वी संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरामध्ये उद्योजक लड्डा यांच्या घरावर मोठा दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात साडेसहा किलो सोनं-चांदी आणि रोख रक्कम लुटण्यात आली होती. या प्रकरणातला मुख्य आरोपी अमोल खोतकरला पोलिसांनी अटक केली होती. त्याचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. खोतकरने सोमवारी मध्यरात्री पोलिसांच्या अंगावर गाडी घालून गोळीबार केला. यावेळी संरक्षणार्थ पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. सध्या अमोल खोतकर याचा मृतदेह घाटी रुग्णालयामध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टम केल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांना दिला जाणार आहे.

Sambhajinagar Shootout: ... तर त्याच्या पायावर गोळी मारायची; अमोल खोतकरच्या एन्काऊंटनंतर बहिणींचे पोलिसांवर गंभीर आरोप
Kalyan Crime : नकली पिस्तूल दाखवत केली पैशांची मागणी; पोलीसात तक्रार केल्याने घरावर दगडफेक, कल्याणमधील धक्कादायक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com