Navi Mumbai: धावत्या एसी बसमध्ये शरीरसंबंध, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी कपलला शोधून काढलं, कोर्टाने ठोठावली शिक्षा

Navi Mumbai AC Bus: नवी मुंबईत धावत्या एसी बसमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या कपलला पोलिसांनी शोधून काढले. या कपलला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना दंड ठोठावला. या कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Navi Mumbai: धावत्या एसी बसमध्ये शरीरसंबंध, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी कपलला शोधून काढलं, कोर्टाने ठोठावली शिक्षा
Navi Mumbai AC BusSaam
Published On

नवी मुंबईमध्ये धावत्या एसी बसमध्ये शरीरसंबंध ठेवतानाचा कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या २२ सेकंदाच्या व्हिडीओनो सोशल मीडियावर धुकाकूळ घातला होता. या घटनेनंतर पोलिसांनी या कपलविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला होता. अखेर या कपलला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. कोर्टाने या कपलला २००० रुपयां दंड ठोठावला.

नवी मुंबई महानगर पालिकेच्या एसी बसमधून प्रवास करत असताना एका कपलने शेवटच्या सीटवर शारीरिक संबंध ठेवले होते. २० एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली होती. या बसच्या शेजारून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने आपल्या मोबाइलमध्ये हा व्हिडीओ शूट केला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तरुणाचे वय २० तर तरुणीचे वय १९ वर्षे असून पोलिसांनी या दोघांना शोधून काढले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना शोधून काढले.

Navi Mumbai: धावत्या एसी बसमध्ये शरीरसंबंध, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी कपलला शोधून काढलं, कोर्टाने ठोठावली शिक्षा
नवी मुंबईतील बिल्डरनं डोक्यात गोळी घालून स्वत:ला संपवलं; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर | Navi Mumbai

या कपलविरोधात बस कंडक्टरने कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी कपलविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या दोघांना शोधून काढले. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना २००० रुपयांचा दंड ठोठावला.

Navi Mumbai: धावत्या एसी बसमध्ये शरीरसंबंध, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी कपलला शोधून काढलं, कोर्टाने ठोठावली शिक्षा
Navi Mumbai Crime : पत्नी घटस्फोट देईना, नवऱ्याने कट रचला; सुपारी देऊन काटा काढला

या कपलने बसमध्ये केलेल्या कृत्याबद्दल कोर्टासमोर पश्चात्ताप व्यक्त केला. यानंतर कोर्टाने त्यांना २००० रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली. या कपलचा बसमध्ये शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या बसच्या कंडक्टरविरोधात कारवाई करण्यात आली होती. बस कंडक्टरला सतर्क न राहिल्याबद्दल आणि जोडप्याला अश्लील कृत्य करण्यापासून न रोखल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. पण नंतर त्याला सेवेत पुन्हा घेण्यात आले.

Navi Mumbai: धावत्या एसी बसमध्ये शरीरसंबंध, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी कपलला शोधून काढलं, कोर्टाने ठोठावली शिक्षा
Navi Mumbai AC bus incident : धावत्या एसी बसमध्ये शारीरिक संबंध ठेवणे भोवले; पोलिसांकडून प्रेमी युगुलावर मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com