Navi Mumbai Crime : पत्नी घटस्फोट देईना, नवऱ्याने कट रचला; सुपारी देऊन काटा काढला

Navi Mumbai News : घटस्फोट देत नसल्याने रागाच्या भरात पतीने त्याच्या पत्नीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. ही घटना नवी मुंबईच्या उलवे परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नवऱ्यासह दोन महिला आरोपींना अटक केली आहे.
Navi Mumbai Crime
Navi Mumbai CrimeSaam Tv
Published On

विकास मिरगणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

नवी मुंबईतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नी घटस्फोट देत नसल्याने पतीकडून तिची सुपारी देऊन भर रस्त्यात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती आणि इतर दोन महिलांना अटक केले आहे. ही धक्कादायक घटना नवी मुंबईच्या उलवे परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे.

रस्त्यावरुन चालत जात असताना दोन आरोपींनी महिलेवर धारदार शस्त्रांनी वार करत तिची हत्या केली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा क्राइम ब्रांचने कसून तपास केला. तेव्हा महिलेच्या हत्येमागे पतीचा हात असल्याचे समोर आले. पती किशोर सिंग राजपूत याने दोन महिला साथीदारांना सोबत घेत हत्येचा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.

Navi Mumbai Crime
Vaishnavi Hagawane : सासरच्यांकडून होणारा छळ नाही, तर वैष्णवीचं सर्वात मोठं दु:ख 'हे' होतं

किशोर सिंग राजपूत आणि त्याची पत्नी अलविना राजपूत यांच्यामध्ये आर्थिक कारणांवरुन वाद सुरु होते. पत्नी घटस्फोट देण्यास नकार देत असल्याचा राग किशोर यांच्या मनात होता. यातून सुटका करण्यासाठी त्याने ६ लाख रुपयांची सुपारी देऊन अलविनाची हत्या घडलून आणली. अलिशा त्यागी आणि चरणजीत कौर या दोन महिलांना किशोरने पत्नीची हत्या करण्याची सुपारी दिली.

Navi Mumbai Crime
Indian Army Soldier Martyred : नगरचा भूमिपुत्र काश्मीरमध्ये शहीद; दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

अलिशा आणि चरणजीत यांनी अलविनाचा काटा काढण्यासाठी पंजाबमधून दोन आरोपींना बोलावले होते. या प्रकरणी पती किशोर सिंग राजपूत, अलिशा त्यागी आणि चरणजीत कौर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष हत्या करणारे आरोपी अजूनही फरार असल्याचे म्हटले जात आहे.

Navi Mumbai Crime
Vaishnavi Hagawane : वैष्णवीच्या नवऱ्याने मारलं, सासऱ्याकडून विनयभंग; कपडे फाडले, केस उपटले, मयुरीनं काय-काय सांगितलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com