Fake Notes : १० हजार रुपयांच्या बदल्यात पाचशेच्या २० हजार रुपयांच्या बनावट नोटा; गेवराईत दोन जणांवर गुन्हा दाखल

Beed News : बनावट नोटा चलनात आणून फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. भारतीय चलनात असलेल्या ५००, २०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटांची छपाई प्रिंटरच्या सहाय्याने करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे
Fake Notes
Fake NotesSaam tv
Published On

योगेश काशीद 
बीड
: बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याचे अनेक प्रकार उघड होत आहेत. बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेटच समोर येत आहे. तर बीडच्या गेवराई शहरात १० हजार रूपयांच्या खऱ्या नोटा देऊन २० हजार रूपयांच्या पाचशेच्या बनावट नोटा घेतल्या. याच नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र बनावट नोटा चलनात येण्यापूर्वीच हा प्रकार उघडकीस आला आहे. 

बनावट नोटा चलनात आणून फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. भारतीय चलनात असलेल्या ५००, २०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटांची छपाई प्रिंटरच्या सहाय्याने करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी असे प्रकार करणाऱ्यांचा फर्दाफ़ाश केला आहे. तरी देखील बनावट नोटा चलनात येणे सुरूच आहे. असाच प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई येथे समोर आला असून छपाई करणारे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. 

Fake Notes
Chandrabhaga River Flood : अवकाळी पावसाचा हाहाकार; पंढरपुरातील ब्रिटिश कालीन पुलासह पाच बंधारे पाण्याखाली, चंद्रभागेतील मंदिरानाही वेढा

१० हजाराच्या खऱ्या नोटा देऊन घेतल्या बनावट नोटा 

गेवराई येथील बालाप्रसाद बाहेती याने चलनातील १० रुपयांच्या खऱ्या नोटा देत अहिल्यानगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील नासेर शेख याच्याकडून २० हजार रुपयांच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेतल्‍या. त्‍या नोटा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चलनात वापरत असल्याचा प्रकार काल धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई बायपास रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर उघडकीस आला. 

Fake Notes
Amravati Farmer : शेतकऱ्यापुढील संकट संपेना; अमरावती जिल्ह्यात महिनाभरात १९ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला असताना त्याच्याजवळ बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले. या वरून पोलीस हवालदार राजु भिसे यांच्या तक्रारीवरून आरोपी बालाप्रसाद बाहेती व नासेर शेख याच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय दिपक लंके हे करित आहेत. दरम्यान या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com