पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान त्यांच्या मुक्कामासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी VVIP सर्किट हाऊसमध्ये त्यांच्या ताब्यातील सूट उपलब्ध करून दिले आहे. शहा यांनी सरकारी निवासस्थानांमध्येच राहण्याची व्यवस्था करावी, अशा स्पष्ट सूचना यंत्रणेला दिल्या होत्या. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने VVIP सर्किट हाउसमध्ये ते राहणार आहेत. पुण्यात ते भाजपच्या कार्यकर्त्यांची भेट घेवून संवाद साधणार आहेत.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नगरच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर प्रवरानगरला अमित शहा यांच्या उपस्थितीत सहकार परिषद आणि शेतकरी मेळावा पार पडणार आहे. या परिषदेची जय्यत तयारी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 20 ते 25 हजार जण या परिषदेला उपस्थित राहणार आहेत, असं नियोजन करण्यात आलं आहे. केंद्रात प्रथमचं स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) पहिल्यांदाचं प्रवरानगरला सहकार परिषदेसाठी येत आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.