Breaking: शिवसेना प्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब - रामदास कदम

शिवसेना नेते रामदास कदम हे शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती.
Breaking: शिवसेना प्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब - रामदास कदम
Breaking: शिवसेना प्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब - रामदास कदमSaam TV

रश्मी पुराणिक

मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम हे शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती. आज त्यांनी पत्रकार परिषदमध्ये अनेक गौप्यस्पोट केले आहेत. शिवसेनेचेच मंत्री आणि नेते अनिल परब यांच्यावर रामदास कदम यांनी गंभीर टीका केली आहे. रामदास कदम यांनी त्यांच्याविरुद्ध चाललेल्या उलट सुलट बातम्यांवर स्पष्टीकरण द्यायाला माध्यमांसमोर आलो असल्याचं कदम यांनी सांगितले. अनिल परब पक्षात मनमानी करत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण आहेत उद्धव ठाकरे की अनिल परब? असा संतप्त सवाल अनिल परब यांनी केला आहे.

Breaking: शिवसेना प्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब - रामदास कदम
Breaking: छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना ही छोटी गोष्ट- कर्नाटक मुख्यमंत्री

मला बदनाम करायचे कट कारस्थन...

रामदास कदम म्हणाले मला बदनाम करायचे कट कारस्थन आहे. राजकीय दृष्ट्या मला संपवण्याचा प्रयत्न आहे. तथाकथित व्हिडीओ क्लिप आली, त्यात मी शिवसेना पक्षाबाबत काही बोललो नाही. मी किरीट सोमय्या यांच्या विरुद्धही काही बोललो नाही, चर्चा नाही, कागदपत्रे दिली नाही, पक्षाला हाणी होईल असं वागलो नाही. अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी जिल्ह्यात येतात, त्यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला असल्याची गंभीर टीका रामदास कदम यांनी अनिल परब यांनी केली आहे.

गद्दार कोण रामदास कदम की अनिल परब?

अनिल परब यांच्या हॉटेल विरोधात बोललो म्हणजे पक्षाविरोधात बोललो असं होत नाही. नार्वेकरांचा बंगला तोडला कारण तो अनधिकृत होता, यांनी बंगले तोडले हॉटेल तोडले. खासगी जागा ही शिवसेनेची का? असा सवालही रामदास कदम यांनी केला. मी सेवेसाठी स्ट्रगल केलं मी भगवा झेंड्याचा शिपाई. माझ्या विरोधात घोषणा दिल्या या मागे कोण मला माहीत आहे. अनिल परब यांनी माझ्या मुलाचा एक फोन उचलला नाही. माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी प्रयत्न केले. स्थानिक आमदाराला बाजूला केलं. गद्दार कोण रामदास कदम की अनिल परब? असा संतप्त सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे. याला मंत्री पद मिळाल्यावर हेच गद्दारी करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com