नीट पेपरफुटी प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची चौकशी करण्याची मागणी
२६ जुलै रोजी ठाकरे बंधू शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढणार
हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले
दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. याचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाले. राज्यात अनेक ठिकाणी तरुणाई, अभिनेते आणि अनेक नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत ठिकठिकाणी निदर्शने केली. या आंदोलनात पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. या पार्श्वभूमिवर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून येत्या २६ जुलै रोजी ठाकरे बंधूं शक्ती प्रदर्शन करणार आहेत. हा मोर्चा शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक पर्यंत निघणार आहे. दरम्यान या प्रकरणी आज ठाकरे बंधूनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.या परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकार तरुणाईला घाबरलं असल्याचे म्हटले. तसेच जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांना मारहाण करणारे पाकिस्तानातून आलेत का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रशासनावर खोचक टीका करत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. त्यांनी दिल्लीला जंतर मंतर येथे अनुभवलेला किस्सा सांगितला. उद्धव ठाकरे म्हणाले, मी दिल्लीला जाऊन आलो तिथे एक बिहार मधला तरुण आंदोलनासाठी आला होता. त्याने नोटबंदीमुळे त्याचा व्यवसाय ठप्प झाल्याचे सांगितले. तसेच माझा राग व्यक्त करण्यासाठी मी इथे आलोय. सर्वच ठिकाणाहून लोक येत आहेत, असे म्हटले.
पुढे त्यांनी न्यायमुर्तींना या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? असा सवाल उपस्थित केला. कबुतर, कुत्रे यांसारख्या असंख्य प्रश्नांवर न्यायमूर्तींना लक्ष द्यायला वेळ आहे मात्र, कॉकरोचकडे लक्ष द्यायला टाईम नाही. दिल्लीतील आंदोलनादरम्यान काही मुली मला भेटल्या त्या मुलींना अतिशय क्रूरपणे मारण्यात आलं. काही मुलींचे कपडे फाटले तर, काहींना रक्त बंबाळ होईपर्यंत मारण्यात आलं. न्याय देवतेने पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? तसेच काहीजण या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जातो. सिव्हिल ड्रेसवरील लोकांकडे पोलिसांकडे काठ्या कशा आल्या. त्यांची ओळख नाही. ते पाकिस्तानमधून गुंड आणले आहेत का? असा संतप्त प्रश्न उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
आज पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी दोषींना शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आदेश देण्यात आल्याचे मोदींनी म्हटले. या प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदींना प्रत्युत्तर देत म्हणाले, ज्यांनी या मुलांवर निर्दीय लाठीचार्च केला. पोलिसांच्या वेषात गुंड घुसले, हे गुंड कुणी आणले होते. पोलिसांच्या लाठ्या त्यांच्या हातात कुठून आल्या ,त्यांनाही शिक्षा करणार का? विद्यार्थ्यांच्या खांद्यावर विरोधक राजकरण करत असतील. तर विद्यार्थ्यांच्या छातीवर गोळ्या कोण घालतेय? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
रविवारी आम्ही मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यात शरद पवार देवेंद्र फडणवीस आले तरी चालतील. दिल्लीत गेल्यानंतर राहुल गांधींसोबत भेटणं झालं नाही, पण त्यांच्यासोबत फोनवर बोलणं झाले. एक राष्ट्र, एक भावना असे झाले आहे. प्रत्येकजण जंतरमंतरवर जाऊ शकत नाही. राज्यातील प्रत्येक शहरात , तालुक्यात गावात आंदोलने होत आहेत. ही तरूणाईची ताकद आहे, त्याला झुरळ म्हटले तेय. त्यांना सरकार घाबरले असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
चालू पत्रकार परिषदेत पत्रकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आता देश भीतीच्या पलीकडे गेलाय. तरूणांच्या मनात काय सुरू आहे, ते ओळखा. हे सरकार निर्दयी आहे. वांगचुक यांना उपोषण सोडायला सांगितलेले, कारण सरकारकडे संवेदना नाही. त्यांना आशी लोकं गेली तर बरे असे वाटते. नीटसाठी जबाबदार कोण आहेत? धर्मेंद्र प्रधान जबाबदार आहेत, त्यांचा राजीनामा घेणार का? त्यामुळे येत्या २६ जुलैला होणाऱ्या आंदोलनात आम्ही तरुणाईसोबत शांततेत रस्त्यावर उतरणार आहोत. यामध्ये जर कोणी समाजकंटक घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही सोडणार नाही. हे आंदोलन कोणाएका पक्षाचे नसून ते विद्यार्थ्यांच्या हक्काचे आहे. मी आणि राज सिद्धीविनायकचरणी सरकारला सुबुद्धी देण्यासाठी आम्ही जातोय. असे ते यावेळेस म्हणाले. दरम्यान आता हे आंदोलन कोणते नवीन वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.