Pune : FDA ची मोठी कारवाई! पुण्यासह महाराष्ट्रातील १० बेकरी, रेस्टॉरंट आणि कॅन्टीनचे परवाने निलंबित

Pune Golden Bakery FDA Raid News : पुण्यातील प्रसिद्ध गोल्डन बेकरीसह महाराष्ट्रातील १० बेकरी, रेस्टॉरंट, डेअरी आणि कॅन्टीनवर FDA ने मोठी कारवाई केली आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
FDA ACTION IN MAHARASHTRA: GOLDEN BAKERY AMONG 10 FOOD ESTABLISHMENTS SUSPENDED OVER HYGIENE VIOLATIONS
FDA ACTION IN MAHARASHTRA: GOLDEN BAKERY AMONG 10 FOOD ESTABLISHMENTS SUSPENDED OVER HYGIENE VIOLATIONSSaam tv
Published On
Summary
  • पुण्यातील गोल्डन बेकरीसह महाराष्ट्रातील १० आस्थापनांवर FDA ची मोठी कारवाई

  • स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने परवाने निलंबित

  • पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील आस्थापनांचा कारवाईत समावेश

सचिन जाधव, पुणे

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध गोल्डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंट, डेअरी आणि कॅन्टीनविरोधात FDA ने मोठी कारवाई केली आहे. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन न केल्याचे आढळून आल्याने या बेकरीचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. गुरुवार आणि शुक्रवारी करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

एफडीएच्या तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अत्यंत अस्वच्छ वातावरण कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष तसेच अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर संबंधित आस्थापनांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली. एफडीएने प्रसिद्ध केलेल्या फोटोंमधून काही ठिकाणी अन्नपदार्थ अत्यंत गलिच्छ आणि अस्वच्छ परिस्थितीत तयार केले जात असल्याचे दिसून येत आहे. या फोटोंमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

FDA ACTION IN MAHARASHTRA: GOLDEN BAKERY AMONG 10 FOOD ESTABLISHMENTS SUSPENDED OVER HYGIENE VIOLATIONS
Snake Facts : सापांना कान नाहीत, मग ते आवाज कसे ऐकतात? ९९ टक्के लोकांना याबद्दल माहिती नाही

कारवाई झालेल्या आस्थापनांमध्ये पुण्यातील मंगळवार पेठेतील स्टार केटरिंग सर्व्हिस, सोमवार पेठेतील अशोक बार अँड रेस्टॉरंट, येवलेवाडीतील गोल्डन मॅजेस्टिक बेकरी, कोंढव्यातील गोल्डन बेकरी आणि बाणेरमधील बिकांगे बिर्यानी एलएलपी यांचा समावेश आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यातील पारगाव पेठ येथील सिद्धार्थ ॲग्रो डेअरी, सांगलीतील हलद भवन कॅन्टीन, साताऱ्यातील महाबळेश्वर येथील सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबा तसेच सिगडी रेस्टॉरंट आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी येथील व्हीबीजीओआर शाळा कॅन्टीनवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

FDA ACTION IN MAHARASHTRA: GOLDEN BAKERY AMONG 10 FOOD ESTABLISHMENTS SUSPENDED OVER HYGIENE VIOLATIONS
Skin Care : चेहऱ्यावर एकाच जागी वारंवार पिंपल येतोय? यामागे असू शकते 'हे' गंभीर कारण; वेळीच व्हा सावध

एफडीएने संबंधित आस्थापनांना आवश्यक सुधारणा करून नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे निकष पूर्ण केल्यानंतरच पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com