Pune News: तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई, पुण्यातील वैशाली अन् रुपाली हॉटेल बंद

Pune FDA Big Action: पुण्यात एफडीएने मोठी कारवाई केली प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रुपालीवर एफडीने धाड टाकली. दोन्ही हॉटेलचे परवाने निलंबित केले.
Pune News: तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई, पुण्यातील वैशाली अन् रुपाली हॉटेल बंद
Pune FDA ActionSaam Tv
Published On: 

पुण्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. एफडीएने पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपालीचे परवाने निलंबित केले. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. स्वयंपाक घरातील अस्वच्छता, उघड्यावर अन्नपदार्थांची साठवणूक आणि अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. एकाच वेळी पुणेकराच्या पसंतीच्या आणि प्रसिद्ध असलेल्या हॉटेल वैशाली आणि रुपालीवर कारवाई करण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली.

एफडीएच्या पथकाच्या तपासणीत हॉटेल वैशालीला ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाले. यापूर्वी नोटीस देऊनही त्रुटी कायम असल्याने वैशाली हॉटेलवर एफडीएने कारवाई केली. रूपाली रेस्टॉरंटमध्येही अस्वच्छता, अयोग्य अन्नसाठवणूक आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव दिसून आला. एफडीएकडून दोन्ही हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. परवाने पूर्ववत होईपर्यंत विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरीलाही बंदी घालण्यात आली आहे.

Pune News: तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई, पुण्यातील वैशाली अन् रुपाली हॉटेल बंद
Tukaram Mundhe : ५ FDA अधिकार्‍यांना सस्पेंड केलं, २१ अधिकारी रडारावर, तुकाराम मुंढेंची सर्वात मोठी कारवाई

कारवाईदरम्यान वैशाली हॉटेलच्या स्वयंपाकघरात जागेची कमतरता असल्याने कच्चा माल ठेवण्यासाठीचा फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या बाजूला ठेवण्यात आल्याचे दिसून आले. डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाच्या शेजारी होता. धुतलेली भांडीही स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवण्यात आल्याचे दिसून आले. उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि अन्य अन्नपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवले होते. इडली आणि डोशाचे पीठ तयार करण्याची प्रक्रियाही असुरक्षित जागेत सुरू असल्याचे एफडीएच्या पथकाला दिसून आले.FDA

Pune News: तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई, पुण्यातील वैशाली अन् रुपाली हॉटेल बंद
FDA Action: बाबा रामदेव यांच्या पतंजलीवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; गायीचे 2,279.7 लीटर तूप जप्त

तर, रूपाली रेस्टॉरंटवर करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान स्वयंपाकघर उघडे आणि असुरक्षित असल्याचे दिसून आले. रेस्टॉरंटमध्ये धूळ, घाण आणि कीटकांचा प्रवेश होण्याची शक्यता होती. रेस्टॉरंटच्या परिसरात पाणी साचणे, अस्वच्छता आणि कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन या त्रुटी कारवाईत आढळल्या. कच्चा माल, अर्धप्रक्रियायुक्त आणि तयार अन्नपदार्थ योग्य प्रकारे झाकून ठेवलेले नसल्याचे दिसून आले. तसेच त्यावर लेबल आणि वापरण्याची अंतिम तारीख नमूद केलेली नव्हती. या सर्व गोष्टी आढळून आल्यानंतर एफडीएने कारवाई केली. हॉटेल वैशाली आणि रुपाली रेस्टॉरेंटच्या बाहेर बंद अशी पाटी लावण्यात आली आहे. पुण्यातील एफ.सी. रोडवर हे दोन्ही प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. यावर कारवाई करण्यात आल्यामुळे पुणेकरांमध्ये चर्चा होत आहे.

Pune News: तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई, पुण्यातील वैशाली अन् रुपाली हॉटेल बंद
बदलीनंतर FDA चं काय होणार? मिशन थांबणार? स्वतः तुकाराम मुंढेंनीच दिलं उत्तर|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.