

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Tukaram Mundhe action against FDA officers : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनातील पाच अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. याशिवाय आणखी २१ अधिकाऱ्यांची विभागीय स्तरावर चौकशी केली जाणार आहे.
हे प्रकरण जुने असून, यासंदर्भातील प्रस्ताव जुलै महिन्यातच पाठवण्यात आला होता. या कठोर कारवाईमुळे एफडीए वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जाहिराती आणि त्यामध्ये करण्यात येणाऱ्या विविध दाव्यांसंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजावलेल्या नोटिसांप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात नोटीस बजावण्यात आलेल्या तिघांचे म्हणणे प्रशासनाने ऐकून घेतले आहे. मात्र, संबंधितांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले असून, पुढील कारवाईसाठी हे प्रकरण आता संयुक्त आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहे.
जाहिराती आणि उत्पादनांसंदर्भात केले जाणारे दावे याबाबतच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित तिघांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसांवर संबंधितांनी आपली बाजू मांडली असून, प्रशासनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे.
आता या प्रकरणाची पुढील प्रक्रिया संयुक्त आयुक्त स्तरावर होणार आहे. पुढील आठवड्यापासून संयुक्त आयुक्तांकडे या प्रकरणाची Adjudication (न्यायनिर्णयन प्रक्रिया) सुरू होणार असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणात अभिनेता अजय देवगण याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे जाहिराती आणि त्यामध्ये करण्यात येणाऱ्या दाव्यांबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे आता विशेष लक्ष लागले आहे.
जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांची दिशाभूल होऊ नये, तसेच जाहिरातींमध्ये करण्यात येणारे दावे कायद्याच्या चौकटीत असावेत, यासाठी प्रशासनाकडून नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. संयुक्त आयुक्त स्तरावरील सुनावणीनंतर या प्रकरणात काय निर्णय होतो आणि संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.