IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडला विजयाचा सूर सापडला, पण भारताने या ५ चुका केल्या नसत्या तर...

India vs New Zealand 4th T20: न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-० अशी आघाडी घेतल्यानंतरही चौथ्या सामन्यात भारताला ८७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडने २५९ धावा उभारल्यानंतर भारतीय संघ १७२ धावांत गारद झाला.
India vs New Zealand 4th T20
India vs New Zealand 4th T20
Published On: 

India vs New Zealand 4th T20 : ५ सामन्यांच्या टी २० मालिकेत भारतीय संघानं ३-० ने विजयी आघाडी घेतल्यानंतरही चौथ्या सामन्यात यजमान न्यूझीलंडनं जबरदस्त कमबॅक केलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजीची धार बोथट करून न्यूझीलंडनं २० षटकांत २५९ धावांचा डोंगर उभारला. हा धावांचा डोंगर पार करण्यासाठी आत्मविश्वासानं मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अवघ्या १७२ धावांत फडशा पाडला आणि उशिरा का होईना एकदाचा विजय मिळवला. सलग तीन सामन्यांत विजय मिळवल्यानं भारतीय संघाचा आत्मविश्वास अतिआत्मविश्वासात बदलला का? भारतीय संघाची स्ट्रॅटेजी चुकली का? फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सगळ्याच आघाड्यांवर भारतीय संघ कुठे चुकला, कमी पडला? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्तानं निर्माण झाले आहेत. (why India lost the fourth T20 against New Zealand)

गोलंदाजी घेण्याचा निर्णय चुकला का?

कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून यजमान न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडमध्ये थंड हवेत चेंडू वेगात स्विंग होतो, त्यामुळे पहिल्यांदा गोलंदाजी करणे आव्हानात्मक असते. तरीही अय्यरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी प्रथम फलंदाजी करण्यासाठी पोषक होती आणि दुसऱ्या डावात चेंडूला अतिरिक्त स्विंग मिळेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. पण तरीही भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

India vs New Zealand 4th T20
Tukaram Mundhe : ५ FDA अधिकार्‍यांना सस्पेंड केलं, २१ अधिकारी रडारावर, तुकाराम मुंढेंची सर्वात मोठी कारवाई

स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाजाची उणीव

या मालिकेत भारताने अद्याप एकही स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज खेळवलेला नाही. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्यासारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज बेंचवर बसले आहेत. न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज चांगली गोलंदाजी करून भारतीय फलंदाजांना बाद करत आहेत, पण भारतीय संघ मात्र अष्टपैलू फिरकी गोलंदाजांवरच अवलंबून आहे. फलंदाजी मजबूत करण्याच्या प्रयत्नात भारत स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाजांना प्लेईंग ११ मधून बाहेर ठेवत आहे. भारताच्या पराभवासाठी हे सर्वात मोठे कारण असू शकते.

गोलंदाजांना धावा रोखता आल्या नाहीत

भारताकडून फक्त अर्शदीप सिंग याने प्रति षटक १० पेक्षा कमी धावा दिल्या. अन्यथा प्रिन्स यादव, मयंक यादव या प्रमुख गोलंदाजांनी प्रति षटक १२ पेक्षा जास्त धावा खर्च केल्या. अक्षर पटेललाही प्रभाव पाडता आला नाही; त्याने एक विकेट घेतली खरी, पण ३ षटकांत ४३ धावा दिल्या. नितीश कुमार रेड्डी याने सुरुवातीच्या षटकांत फलंदाजांना रोखले, पण डेथ ओव्हरमध्ये त्याची गोलंदाजी प्रभाव पाडू शकली नाही. त्याच्या एका षटकात सलग ४ षटकार मारण्यात आले. मयंक यादवने ३ विकेट घेतल्या, पण त्यासाठी त्याने प्रति षटक १२ धावा खर्च केल्या.

सुरुवात खराब आणि फलंदाजीत अपयश

पहिल्या ३ सामन्यांत भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. भारतीय फलंदाजांसमोर न्यूझीलंडचे गोलंदाज हतबल झाले होते. पण चौथ्या सामन्यात मात्र चित्र पूर्णपणे वेगळे पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचे दिग्गज आणि स्फोटक फलंदाज टिकलेच नाहीत. एकाही फलंदाजाला ५० धावांचा टप्पा पार करता आला नाही. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. संजू सॅमसन, इशान किशन, अक्षर पटेल यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अभिषेक शर्मा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनाही ३० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. नमन धीर, रेड्डी आणि प्रिन्स यादव यांनी शेवटी धावांचा पाऊस पाडला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत भारतीय फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखले.

India vs New Zealand 4th T20
Eknath Shinde : शिंदेंकडून थेट निलंबनाच्या कारवाईचे आदेश; आमदार गायकवाडांचा यू-टर्न, थेट कॅमेऱ्यासमोरच म्हणाले...

संघ निवड चुकली का?

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात संघात दोन बदल करण्यात आले. फॉर्मात असणारा वैभव सूर्यवंशी आणि भुवनेश्वर कुमार यांना प्लेईंग ११ च्या बाहेर बसवण्यात आले. इशान किशनला संधी मिळाली, पण त्याला खातेही उघडता आले नाही. भारताने प्लेईंग ११ मध्ये एकही स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाजाला स्थान दिले नाही. न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज सातत्याने विकेट घेत असताना, भारताचे दिग्गज फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव बाहेर बसले आहेत. भारताला मधल्या षटकांत धावा रोखण्यात अपयश आल्यानेच न्यूझीलंडला २५९ धावांचा डोंगर उभारता आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.