प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

28-Year-Old Director Belraj Kalarikkal Death: ‘काप्पी स्क्वाड’ वेब सीरिजचे दिग्दर्शक बेलराज कलारिकल यांचे वयाच्या २८व्या वर्षी निधन झालंय. कोची येथील हॉटेलच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळल्याने मल्याळम मनोरंजन विश्वात शोककळा पसरलीय.
Kappi Squad web series director Belraj Kalarikkal dies at 28
Kappi Squad web series director Belraj Kalarikkal dies at 28saam tv
Published On: 
Summary
  • ‘काप्पी स्क्वाड’ वेब सीरिजचे दिग्दर्शक बेलराज कलारिकल यांचे निधन

  • कोची येथील एका हॉटेलच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळला.

  • निधनाच्या सुमारे महिनाभर आधीच त्यांचा विवाह झाला होता.

चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आलीय.काप्पी स्क्वाड या वेब सीरिजचे दिग्दर्शक बेलराज कलारिकल यांचे निधन झालंय. बेलराज कलारिकल हे 28 वर्षांचे होते. कोची येथील एका हॉटेलच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळला होता. बेलराजच्या अचानक झालेल्या निधनानं चित्रपटसृष्टीत शोककळा पसरलीय.कलारिकल यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसलाय. बेलराज कलारिकल यांचं महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार, कोची येथील एका हॉटेलच्या खोलीत ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मल्याळम चित्रपटसृष्टीत तसेच त्यांचे मित्र आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरलीय. दिग्दर्शनाखाली तयार झालेली पहिलीच सिरीज काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. हाती आलेल्या माहितीनुसार कलारिकल यांचे निधन हे हृदयविकाराचा झटक्याने झालंय.

Kappi Squad web series director Belraj Kalarikkal dies at 28
Famous Actress Pregnant : ५२ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार! बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे PHOTO अन् VIDEO व्हायरल

बेलराज कलारिकल हे मूळचे कोट्टयममधील मणिमाला येथील राहणारे होते. ते सध्या दिग्दर्शक श्रीकांत यांच्यासोबत कोची येथील एका हॉटेलमध्ये राहत होते. घटनेच्या दिवशी श्रीकांत यांनी अनेकवेळा दरवाजाची बेल वाजवली, परंतु बेलराज यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर संशय आल्यावर पाहणी केली असता बेलराज यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

Kappi Squad web series director Belraj Kalarikkal dies at 28
Jailer 2: 'जेलर 2' च्या शेवटच्या ५ मिनिटांत मोठा ट्विस्ट! विजय सेतुपतीच्या एंट्रीमुळे तिसऱ्या भागाची रंगली चर्चा

बेलराज महिन्याभरापूर्वीच विवाहबंधनात अडकले होते. तब्बल 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 11 सप्टेंबर 2026 रोजी अथिरा बिंदू साबू यांच्याशी विवाह केला होता. मात्र लग्नाला अवघा एक महिना पूर्ण झाला होता. या घटनेमुळे त्यांचे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. जिओ हॉटस्टारने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून बेलराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बेलराज यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली काप्पी स्क्वाड ही वेब सिरीज 15 ऑक्टोबरपासून ‘जिओ हॉटस्टार’ वर प्रदर्शित झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com