Jailer 2: 'जेलर 2' च्या शेवटच्या ५ मिनिटांत मोठा ट्विस्ट! विजय सेतुपतीच्या एंट्रीमुळे तिसऱ्या भागाची रंगली चर्चा

Jailer 2: रजनीकांत यांच्या जेलर २ चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये विजय सेतुपतीच्या एन्ट्रीने मोठा ट्विस्ट आला आहे. मुथुच्या कुटुंबाचे पुढे काय होणार? जेलर ३ येणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
Jailer 2
Jailer 2Saam Tv
Published On: 

Jailer 2: सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ चित्रपट काल १५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट थिएटरमध्ये आल्यापासून ‘जेलर २’च्या क्लायमॅक्सची सध्या चर्चा रंगली आहे. ॲक्शन, विश्वासघात आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठीचा संघर्ष यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, क्लायमॅक्सला अभिनेता विजय सेतुपतीची एन्ट्री मोठा ट्विस्ट देतो. त्यामुळे आता ‘जेलर ३’ येणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

काय आहे ‘जेलर २’च्या क्लायमॅक्समध्ये?

नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत पुन्हा एकदा टायगर मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत दिसतात. यावेळी त्यांचा सामना मूर्ती तस्करी करणाऱ्या गँगशी होतो. या टोळीमुळे मुथु आणि त्याच्या कुटुंबाचे आयुष्य धोक्यात येते. चक्री कल्पकची भूमिका साकारणारे मिथुन चक्रवर्ती मुथुला संपवण्यासाठी मोठा प्लॅन करतात. त्यात मुथुची मुलगी कांता, म्हणजेच विद्या बालनची अडकते.यानंतर, बोधी म्हणजेच एस. जे. सूर्या एका विमानातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मुथु आणि त्याचे सहकारी नरसिंहा (शिवराजकुमार), मॅथ्यू (मोहनलाल) आणि कामदेव (जॅकी श्रॉफ) त्याला रोखतात. यामुळे तस्करी करणाऱ्या गँगचा शेवट होतो.

Jailer 2
Musician Death: संगीत विश्वाला मोठा धक्का! प्रसिद्ध संगीतकाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

संकट अजून टळलेलं नाही

कुटुंबाला आता कोणताही धोका नसल्याची खात्री झाल्यानंतर मुथु पोलिसांसमोर सरेंडर होतो. तो आपला मुलगा अर्जुनच्या हत्येची कबुली देतो. त्यानंतर पोलीस त्याला बेड्या घालून कुटुंबासमोर आणतात. मात्र, याच वेळी चित्रपटात मोठा ट्विस्ट येतो. त्याची मुलगी कांताचा एक व्हिडिओ मिळतो. यामध्ये ती जखमी अवस्थेत व्हीलचेअरवर बसलेली असते. त्यावरुन मुथुला कळतं संकट अजून टळलेलं नाही.

Jailer 2
Imran Khan: इम्रान खानला देश सोडून जाण्याची नोटीस का मिळाले? अभिनेता नक्की कोणत्या देशाचा नागरिक आहे?

विजय सेतुपतीची एन्ट्रीने

क्लायमॅक्समधील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे विजय सेतुपतीची एन्ट्री. मुथुला या व्हिडिओला उत्तर देण्यास सांगणारा पोलीस अधिकारी दुसरा कोणी नसून विजय सेतुपती असल्याचे समोर येते. यामुळे मुथु आणि त्याच्या कुटुंबासमोरील संकट संपले आहे की आणखी मोठा धोका त्यांची वाट पाहत आहे, याची उत्सुकता वाढली आहे.

'जेलर ३' येणार का?

विजय सेतुपतीची एन्ट्रीमुळे ‘जेलर ३’ लवकरच येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. रजनीकांत यांच्यासोबत रम्या कृष्णन, योगी बाबू, विद्या बालन, मोहनलाल, शिवराजकुमार आणि जॅकी श्रॉफ यांसारख्या कलाकार आहे. आता या कथेचा पुढील भाग येणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com