Famous Actress Pregnant : ५२ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार! बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे PHOTO अन् VIDEO व्हायरल

Actress Pregnancy Announcement : प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Actress Pregnancy Announcement
Famous Actress PregnantSAAM TV
Published On: 
Summary

प्रसिद्ध अभिनेत्री ५२ व्या वर्षी आई होणार

सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्रीने चाहत्यांना दिला सुखद धक्का

मनोरंजनसृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. ऑस्कर विजेती अभिनेत्री हिलरी स्वँक (Hilary Swank) आणि पती फिलिप श्नायडर (Philip Schneider)ने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. दोघेही आपल्या तिसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. अभिनेत्री हिलरी स्वँक तिसऱ्यांदा आई होणार आहे.

गुरुवारी न्यूयॉर्क शहरात एका कार्यक्रमातून बाहेर पडताना 'मिलियन डॉलर बेबी' फेम ही अभिनेत्री हिलरी स्वँक पांढऱ्या रंगाच्या क्रॉप वेस्टमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहत. त्यानंतर तिने यासंबंधित सोशल मीडियावर देखील पोस्ट शेअर केली आहे. चाहते आणि कलाकार मंडळी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहे.

अभिनेत्री हिलरी स्वँक एका खास अंदाजात आपल्या प्रेगनेंसीची घोषणा केली. तिने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, "अनेक लोक मला विचारत आहेत की माझा पुढचा प्रोजेक्ट कोणता आहे, तर तो डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे." व्हिडीओमध्ये एक क्युक्ट फॅमिली डान्स करताना दिसत आहे. स्वँक आणि श्नायडर यांनी एप्रिल २०२३ मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. ज्यांची नाव 'ओहम' (मुलगा) आणि 'आया' (मुलगी) अशी आहेत.

हिलरी स्वँक हिने २०१८ मध्ये फिलिप श्नायडरसोबत लग्नगाठ बांधली. दोघांना नवीन आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देत आहे. वयाच्या 52 व्या वर्षी अभिनेत्री आई होणार आहे. हिलरी स्वँक ही मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री आहे.

Actress Pregnancy Announcement
Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला ६० व्या वर्षी व्हायचे 'बाबा'; खुलासा करत म्हणाला - "मला मुलांची..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com